कोल्हापूर / प्रतिनिधी:
विद्यार्थ्यांनी बौद्धिक क्षमता वाढविण्याकरिता प्राथमिक शाळेपासूनच विविध स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणे गरजेचे असल्याचे मत युवा व्याख्याते विनायक गायकवाड यांनी व्यक्त केले.
येथील कल्याणी हॉल येथे शिव शंभो चॅरिटेबल ट्रस्टचे वतीने छत्रपती संभाजी महाराज जयंती निमित्त झालेल्या छावा शिष्यवृत्ती स्पर्धा परीक्षेच्या बक्षीस वितरण कार्यक्रमात ते बोलत होते.
विश्वास साखर कारखान्याचे संचालक विश्वास कदम अध्यक्षस्थानी तर युवा उद्योजक नेपोलियन सोनुले व विजय महाडिक हे प्रमुख उपस्थित होते.
यावेळी बोलताना विनायक गायकवाड म्हणाले, स्पर्धेच्या युगात विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या शैक्षणिक आव्हानांना सामोरे जावे लागत आहे. यामध्ये आपला टिकाव लागायचा असेल तर प्राथमिक शाळेपासूनच वेगवेगळ्या अभ्यासक्रमाद्वारे परीक्षांचा सराव करणे गरजेचे आहे. शैक्षणिक क्षेत्रात सातत्याने होणारे बदल पालकांनी लक्षात घेऊन आपल्या पाल्यांना त्यादृष्टीने तयार करावे. प्राथमिक शाळेपासूनच पाया मजबूत केल्यास विद्यार्थ्याची मानसिकता सदृढ होते.
प्रारंभी वृक्ष रोपास पाणी घालून व छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला. स्वागत व प्रास्ताविक महेश रानमाळे यांनी केले. विश्वास कदम, विजय महाडिक, शिवशंभो चॅरिटेबल ट्रस्ट संस्थापक अध्यक्ष सुजित सुजित पाटील यांनी मनोगत व्यक्त केले.
छावा शिष्यवृत्ती स्पर्धा परीक्षेच्या उत्तीर्ण विद्यार्थ्यांना गोल्ड, सिल्व्हर व ब्राँझ मेडल व शालोपयोगी साहित्य देऊन गौरविण्यात आले. कार्यक्रमास शैक्षणिक, सामाजिक सांस्कृतिक,कृषी व राजकीय क्षेत्रातील मान्यवर
यांच्यासह विद्यार्थी पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सूत्र संचालन संजय जितकर सर यांनी केले तर आभार पै. अथर्व रानमाळे यांनी मानले.