Thursday, June 19, 2025
Google search engine
Homecrimeपुष्पक एक्स्प्रेस ट्रेनमधून १२ प्रवासी ट्रॅकवर पडले, ५ जणांचा मृत्यू

पुष्पक एक्स्प्रेस ट्रेनमधून १२ प्रवासी ट्रॅकवर पडले, ५ जणांचा मृत्यू

आठवड्याच्या पहिल्याच दिवशी मुंबई लोकलमध्ये मोठी दुर्घटना घडली आहे. मध्य रेल्वेमार्गावर आज 9 जून सकाळी एक मोठा अपघात झाला. पुष्पक एक्स्प्रेस कसाऱ्याच्या दिशेने जात असताना या गाडीतून ८ ते १० प्रवासी रेल्वे ट्रॅकवर पडले. या प्रवाशांना तातडीने रुग्णावाहिका आणून कळव्यातील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मात्र या पाचही प्रवाशांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. मध्य रेल्वेच्या दिवा ते कोपर रेल्वे स्थानकादरम्यान ही घटना घडली. पुष्पक एक्स्प्रेस ट्रेनमध्ये प्रचंड गर्दी होते. त्यामुळे हे प्रवासी दारात लटकले होते. नेमकं काय घडलं होतं, याबाबतची अधिकृत माहिती समोर आली नाही.

गर्दी असल्यामुळे मिळेल ती लोकल पकडून मुंबईकर कामासाठी निघाले होते, पण या भयंकर घटनेनुळे ८-१० जण गंभीर जखमी झाल्याचे समजतेय. या अपघातामध्ये ५ जणांचा मृत्यू झाल्याचे समजतेय. ही दुर्घटना सकाळच्या गर्दीच्या वेळेस घडल्याने प्रचंड घबराट उडाली. जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू असून रेल्वेने या घटनेची गंभीर दखल घेतली आहे. संपूर्ण तपास सुरू करण्यात आला आहे.

दिवा ते मुंब्रा रेल्वे स्थानकादरम्यान पाच जण एक्स्प्रेसमधून पडले. या पाचही प्रवाशांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त केली जात आहे. पुष्पक एक्स्प्रेसमधून पाच प्रवासी खाली पडल्याची माहिती आहे. मात्र प्रवासी नेमके कसे खाली पडले, हे अद्याप समजू शकलेलं नाही. दरम्यान अॅम्ब्युलन्समधून त्यांना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात येत आहे. पुष्पक एक्स्प्रेस मुंबई ते लखनौदरम्यान धावते. सीएसएमटीवरुन सकाळी 8.25 वाजता पुष्पक एक्स्प्रेस निघाली होती. पुष्पक एक्स्प्रेसचा पुढचा थांबा कल्याण रेल्वे स्थानक होता. मात्र दिवा आणि मुंब्रा स्थानकादरम्यान आल्यावर हे प्रवासी रेल्वेतून पडले

कसाऱ्याला जाणाऱ्या रेल्वेच्या गार्डने दिली माहिती-

पाच प्रवासी मुंब्रा स्थानकाजवळ रेल्वेतून खाली पडले. कसाऱ्याला जाणाऱ्या रेल्वेच्या गार्डनं याबाबतची माहिती दिली. नेमक्या कोणत्या गाडीतून प्रवासी खाली पडले, याबाबत अद्याप माहिती नाही, अशी माहिती मध्य रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी स्वप्नील निला यांनी दिली.

spot_imgspot_img
RELATED ARTICLES
Today Live News
Most Popular News