प्रयाग चिखली वार्ताहर : कोल्हापूर- रत्नागिरी महामार्गावर रजपूतवाडी फाट्यावर दुचाकी आणि एस.टी. बस यांच्यात झालेल्या अपघातात ३५ वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू झाला. मृत तरुण नविन चिखली(ता. करवीर )गावचा रहिवासी असून, अपघातात गाडी स्लिप झाल्याने बसच्या पुढच्या चाकाखाली आल्याने त्याच्या छातीवर गंभीर इजा होऊन त्याचा जागीच मृत्यू झाला. हे घटना दुपारी साडेचार वाजण्याच्या सुमारास घडली. घटनास्थळी करवीर पोलिसांनी पंचनामा केला.
याबाबतची अधिक माहिती अशी
मृत तरुण हा प्लंबिंग काम करत होता केर्ली येथे त्याचे काम चालू होते मटेरियल आणण्यासाठी तो केर्ली गावाकडून रजपूतवाडीकडे दुचाकीवरून येत होता. त्याच दरम्यान, कोल्हापूरहून येणारी एस.टी. बस समोरून आली होती. या घटनेत त्याच्या छातीवरूनवरून बसचे पुढचे चाक गेल्याने जागीच मृत्यू झाला.
मृत व्यक्तीच्या पश्चात आई, वडील आणि दोन भाऊ असा परिवार आहे. या दुर्दैवी घटनेमुळे संपूर्ण गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.
अपघाताची माहिती मिळताच स्थानिक पोलीस घटनास्थळी करवीर पोलिसांनी पंचनामा केला.