Wednesday, July 9, 2025
Google search engine
HomecrimeAhmedabad Plane Crash: भरल्या ताटावरच विद्यार्थ्यांनी सोडलं प्राण

Ahmedabad Plane Crash: भरल्या ताटावरच विद्यार्थ्यांनी सोडलं प्राण

एअर इंडियाचे विमान ज्या इमारतीवर कोसळले ती इमारत बीजे मेडिकल कॉलेजच्या हॉस्टेलची होती. दुपारची वेळ असल्याने सर्व इंटर्न डॉक्टर जेवणासाठी हॉस्टेलवर परतले होते. जेवत असतानाच ही दुर्घटना घडल्यामुळे अनेकांना आपला जीव भरल्या ताटावरच गमावावा लागला. 

या अपघातात विमानातील प्रवाशांबाबत अद्याप माहिती समोर आलेली नसली तरी या हॉस्टेलमध्ये असलेले किमान २० इंटर्न डॉक्टरांचा मृत्यू झाल्याचे सांगितले जात आहे. हॉस्टेलच्या मेसच्या इमारतीवर हे विमान पहिल्यांदा आदळले होते. यावेळी बहुतांश डॉक्टर जेवण करत होते. या दुर्घटनेचे काही फोटो समोर आले असून मेसमध्ये जेवणाची ताटे तशीच टेबलवर असलेली दिसत आहेत. डॉक्टरांच्या मृत्यूचा आकडा वाढण्याची शक्यता देखील वर्तवण्यात येत आहे. 

या अपघातग्रस्त बोईंग ७८७-८ विमानात २४२ प्रवासी आणि क्रू मेंबर्स होते. यापैकी १६९ भारतीय नागरिक, ५३ ब्रिटिश नागरिक, १ कॅनेडियन नागरिक आणि ७ पोर्तुगीज नागरिक आहेत.

spot_imgspot_img
RELATED ARTICLES
Today Live News
Most Popular News