Wednesday, July 9, 2025
Google search engine
Homecrimeविमान अपघातात पिंपरीच्या 22 वर्षीय तरुणाचा मृत्यू; मृतदेह ताब्यात घेण्यासाठी शेख कुटुंब...

विमान अपघातात पिंपरीच्या 22 वर्षीय तरुणाचा मृत्यू; मृतदेह ताब्यात घेण्यासाठी शेख कुटुंब अहमदाबादला रवाना

अहमदाबादहून लंडन या ठिकाणी निघालेल्या विमानाचा काल (दि.12) काही मिनिटांतच भीषण अपघात झाला. टेक ऑफ नंतर 700 फुटांच्या वर गेलेलं विमान कोसळलं आणि यातल्या प्रवाशांचा मृत्यू झाला. नेमका किती जणांचा मृत्यू झाला हे अद्याप स्पष्ट झालेले नसले तरी महाराष्ट्रातील अनेक कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. राज्यातील एकूण 10 जणांचा या दुर्घटनेत मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. 

एअर इंडियाच्या या विमानात 230 प्रवासी आणि 12 क्रू मेंबर्स होते. या क्रू मेंबर्सपैकी एकजण पिंपरी चिंचवड शहरातील होता. इरफान समीर शेख असे या क्रू मेंबरचे नाव असून या दुर्घटनेत त्यांचा मृत्यू झाला आहे.  संत तुकारामनगर येथील राहणारा असून , लंडनला जाणा-या विमानाचे टेक ऑफ करण्याअगोदर त्याने आईसोबत संवाद साधला होता. अशी माहिती त्याच्या नातेवाईकांकडून देण्यात आली आहे. 

इरफान शेख हा आपल्या कुटुंबासोबत पिंपरी चिंचवड शहरातील संत तुकाराम नगर परिसरात वास्तव्यास होता. नुकताच तो बकरी ईद निमित्त घरी आला होता. त्याने आई, भाऊ त्यांच्या नातेवाईक सोबतच बकरी ईद साजरी केली होती.  तीन दिवस तो घरी थांबला होता.

इरफान शेख हा एअर इंडिया च्या फ्लाइट मध्ये कॅबिन क्रू म्हणून कार्यरत होता. मात्र काल त्याचा एअर इंडियाच्या विमान अपघातात त्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची दुर्दैवी बातमी त्याच्या कुटुंबीयांना मिळाली आणि त्याच्या कुटुंबीयांवर एकच दुखाच डोंगर कोसळला.  

इरफान च पार्थिव आणण्यासाठी इरफानची आई आणि त्याचा भाऊ हा अहमदाबादकडे रवाना झाले आहेत.  मात्र त्याच्या कुटुंबीयांची डीएनए तपासणी झाल्यानंतरच इरफानच पार्थिव त्यांना सुपूर्द करण्यात येईल अशी माहिती इरफानचे काका  फिरोज शेख यांनी दिली आहे.

spot_imgspot_img
RELATED ARTICLES
Today Live News
Most Popular News