बालिंगा : (मोहन कांबळे) बालिंगा तालुका करवीर येथील श्री कात्यायनी सहकारी दूध व्यवसायिक संस्था चे चेअरमन पदी श्रीमती अनिता विष्णू जत्राटे व व्हाईस चेअरमन पदी श्री यशवंत गुंडा माळी यांची आज बिनविरोध निवड करण्यात आली.
सदर निवडीचे वेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाउपाध्यक्ष मधुकर जांभळे, तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष अनिल पोवार, एम.एस.भवडआबा अमर जत्राटे, श्रीकांत भवड, जनार्दन जांभळे, नंदकुमार जांभळे , विजय जत्राटे व संस्थेचे सर्व संचालक ,सचिव संजय वाघवेकर उपस्थित होते.
या निवडीनंतर चेअरमन व व्हाइस चेअरमन यांचे पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.