Wednesday, July 9, 2025
Google search engine
HomePOLITICALकोण गेलं- आलं फरक पडत नाही, जनता आमच्या सोबत; आमदार सतेज...

कोण गेलं- आलं फरक पडत नाही, जनता आमच्या सोबत; आमदार सतेज पाटलांनी ठोकला शड्डू

कोल्हापूर:

स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका तोंडावर असताना काँग्रेस आमदार सतेज पाटील यांच्या अनेक खंद्या शिलेदारांनी आमदार पाटील यांची साथ सोडलीय मात्र अशा अनेक अडचणी याआधी माझ्या आयुष्यात आल्या, कोण गेलं कोण आलं याचे आम्हाला फरक पडणार नाही, जो पर्यंत सामान्य जनता आमच्यासोबत आहे तोपर्यंत कोणत्याही ऑपरेशन आमच्यामध्ये येणार नाहीत, ज्या काही राजकीय घडामोडी घडल्या ते लोकांना आवडलेले नाही त्यामुळे सामान्य जनता आमच्या सोबत येत असल्याचे सांगत आमदार सतेज पाटलांनी आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी शड्डू ठोकलाय.
अहमदाबाद विमान अपघातातील ब्लॅक बॉक्स मिळालेला आहे त्यावरून नेमके काय घडले याची माहिती लोकांपर्यंत यायला हवी, विमान प्रवास करणाऱ्यांची संख्या जास्त आहे. भारतात ही घटना झाल्याने प्रवाशांमध्ये भारताबद्दलची विश्वासार्हता निर्माण करणे महत्त्वाचे आहे, भारतात यापुढे अशा घटना घडणार नाहीत असे चित्र जगासमोर जाणे गरजेचे आहे, या सर्व प्रकरणाकडे गांभीर्याने बघणे गरजेचे असून कुटुंबियांना सांत्वन करणे गरजेचे आहे, फोटोसेशन करून नेमके काय मिळणार आहे हे कळत नाही असेही आमदार सतेज पाटील म्हणाले.
प्रहार संघटनेचे अध्यक्ष आणि राज्याचे माजी मंत्री बच्चू कडू यांनी शेतकरी कर्जमाफीबद्दल अन्नत्याग आंदोलन सुरू केले आहे याचा आजचा सातवा दिवस असून सरकार याकडे दुर्लक्ष करत आहे, या संदर्भात राज्य सरकारने नेमलेल्या समितीला कार्यकाळ दिला आहे का माहित नाही, सरकार आले की कर्जमाफी करू असे मुख्यमंत्र्यांनी भाषणात सांगितले होते. समिती तयार केली आहे मात्र त्याला कार्यकाळ द्यायला हवा, केवळ जिल्हा परिषदेच्या निवडणुका आहेत म्हणून दिखाव्यासाठी समिती स्थापन होता कामा नये, स्थानिक स्वराज्य संस्थेसाठी प्रभाग रचना करण्याचा अधिकार निवडणूक आयोगाला होता मात्र 2 वर्षांपूर्वी कायदा बदलण्यात आला आता हे सर्व अधिकार नगर विकास विभागाने घेतले आहेत याचाच आम्हाला आक्षेप आहे, राज्यात प्रभाग रचना करताना कोणत्याही दबावाने प्रभाग रचना करता कामा नये, राज्यातील प्रत्येक प्रभाग रचनेवर आमचे बारीक लक्ष असेल अधिकाऱ्यांनी चुकीचे आणि दबावाखाली काहीही करू नये, राज्यात माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि मनसे प्रमुख राज ठाकरे एकत्र येण्याच्या चर्चा सुरू आहे यावर बोलताना आमदार सतेज पाटील म्हणाले, स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वात दोन्ही ठाकरे बंधू तयार झाले आहेत, हे दोघे या राज्याच्या हितासाठी एकत्र येत असतील तर काँग्रेस म्हणून आमच्या शुभेच्छा आहेत.

spot_imgspot_img
RELATED ARTICLES
Today Live News
Most Popular News