पुणे प्रतिनिधी: मावळ तालुक्यातील कुंडमाळ्याजवळील इंद्रायणी नदीवरील पूल रविवारी (दि.१५) अचानक कोसळला. या घटनेत पूलावरून प्रवास करत असलेले अंदाजे २० ते २५ जण नदीच्या प्रवाहात वाहून गेल्याचे समजते. तसेच ५ ते ६ जणांचा मृत्यू झाल्याची भीती देखील व्यक्त होत आहे.
घटनास्थळी बचाव पथक दाखल झाले असून स्थानिक प्रशासन आणि आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा शोधकार्य सुरू आहेत. अद्याप अधिकृत मृतांची संख्या स्पष्ट झालेली नाही. पूल अचानक कोसळल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान, नागरिकांना परिसरापासून दूर राहण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.