कोल्हापूर: जिल्ह्यात रविवारी पावसाने दमदार सुरवात केली. धरणक्षेत्रातही जोरदार पाऊस असल्याने पाटबंधारे विभागाने राधानगरी धरणातून विसर्ग वाढवला आहे. सध्या प्रति सेंकद २५०० घनफूट पाण्याचा विसर्ग सुरू असल्याने ‘भोगावती’, ‘पंचगंगा’ काठावरील नागरिकांना सतर्कतेचा इशारा विभागाच्या वतीने देण्यात आला आहे.
गेल्या 24 तासांत जिल्ह्यात सरासरी १६.४ मिलिमीटर पाऊस झाला. शाहूवाडी, गगनबावडा, गडहिंग्लज, आजरा, कागल, भुदरगड तालुक्यांत जोरदार पाऊस कोसळला. धरणक्षेत्रातही जोरदार पाऊस सुरू असल्याने राधानगरी, दूधगंगा, कासारी, घटप्रभा, तुळशी धरणातून विसर्ग सुरू केला आहे. त्यामुळे ‘भोगावती’ व पंचगंगा नदीच्या पातळीत वाढ होत आहे. पंचगंगा नदीवरील राजाराम बंधाऱ्याची पाणी पातळी १७ फुटावर गेली आहे. सद्या जिल्ह्यात सात बंधारे पाण्याखाली गेले आहेत.
पाण्याखालील 7 बंधारे :
रुई – ४३ फूट १० इंच
इचलकरंजी – ३५ फूट ९ इंच
तेरवाड – ३३ फूट ०५ इंच
शिरोळ – २८ फूट ०८ इंच
नृसिंहवाडी – २४ फूट ०२ इंच