Wednesday, July 9, 2025
Google search engine
HomePOLITICALकेंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी घेतली पद्मश्री डॉ डी. वाय. पाटील यांची...

केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी घेतली पद्मश्री डॉ डी. वाय. पाटील यांची भेट

कोल्हापूर :

केंद्रीय सामाजिक न्याय व सक्षमीकरण राज्यमंत्री रामदास आठवले यांनी डी. वाय. पाटील ग्रुपचे संस्थापक आणि त्रिपुरा, बिहार आणि पश्चिम बंगालचे माजी राज्यपाल पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील यांची भेट घेतली. डॉ. पाटील यांच्या तब्येतीची विचारपूस करून आठवले यांनी शैक्षणिकसह विविध विषयांवर त्यांच्याशी चर्चा केली.

केंद्रीय मंत्री आठवले सोमवारी कोल्हापूर दौऱ्यावर आले होते. सकाळी पत्रकारांशी संवाद साधल्यानंतर नाम. आठवले यांनी कसबा बावडा येथे यशवंत निवासस्थानी जाऊन पद्मश्री डॉक्टर डी वाय पाटील यांची भेट घेतली. डी.वाय. पाटील ग्रुपचे अध्यक्ष डॉ. संजय डी. पाटील यांनी पुष्पगुच्छ देऊन आठवले यांचे स्वागत केले.

यावेळी श्री राम सोसायटीचे चेअरमन संतोष पाटील, माजी नगरसेवक मोहन सालपे, सुभाष बुचडे, श्रीराम सोसायटीचे माजी चेअरमन राजीव चव्हाण, महादेव लांडगे, मिलिंद पाटील, राजीव चव्हाण,सागर यवलुजे यांनी पुष्पगुच्छ देऊन रामदास आठवले यांचे स्वागत केले.

डॉ. डी. वाय. पाटील कुटुंबीय आणि आठवले कुटुंबीयांचे गेल्या अनेक वर्षांचे ऋणानुबंध आहेत. या पार्श्वभूमीवर आज कोल्हापूर दौऱ्यावर आल्यावर आठवले यांनी पद्मश्री डॉ. डी वाय पाटील यांच्या निवासस्थानी भेट दिली. यावेळी आठवले यांनी डॉ. डी. वाय पाटील यांच्या प्रकृतीची विचारपूस करत शिक्षण क्षेत्रासह विविध विषयावर चर्चा केली.

यावेळी आरपीआय आठवले गटाचे जिल्हा अध्यक्ष उत्तम कांबळे, प्रा. शहाजी कांबळे आदी उपस्थित होते.

spot_imgspot_img
RELATED ARTICLES
Today Live News
Most Popular News