मादळे तालुका करवीर येथील “विद्यामंदिर मादळे”, माध्यमिक शाळेमध्ये दिनांक 16 रोजी शाळा सुरू होण्याच्या पहिल्याच दिवशी,”शालेय साहित्य वाटप” तसेच “वृक्षारोपण” करण्यात आले.
यावेळी दिवंगत मंत्री दिग्विजय खानविलकर यांचे नातू विरविजय खानविलकर, उपसरपंच सतीश चौगुले, कु.नागावकर, शाळेचे मुख्याध्यापक-विजय सुतार ,शरद साळुंखे,प्रकाश शिसाळ ,शोभा आरगे , स्वाती बुचडे , माजी सरपंच-बाबासाहेब भारतीय,”संजय गांधी अर्थसहाय्य निराधार योजना” करवीर सदस्य- संभाजी पाटील,’बहुद्देशीय सेवाभावी संस्था’अध्यक्ष-अमर परमित, बहुउद्देशीय सेवा संस्थेच्या उपाध्यक्ष- सौ.मंदाकिनी पारमीत, सचिव-साहिल कांबळे,संतोष मानकपुरे,”तंटामुक्त” अध्यक्ष-उत्तम चौगुले,अनिकेत पारमित, अक्षय बुचडे पालक, इतर कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी ‘बहुउद्देशीय सेवाभावी संस्थे तर्फे प्रत्येक विद्यार्थ्याला ‘एक झाड’ देऊन घरी नेऊन बांधावर,शेतामध्ये,परसांमध्ये लावण्याचे आवाहन करण्यात आले .