बालिंगे(मोहन कांबळे): बालिंगा ते बोंद्रे नगर हा रस्ता सध्या वाहतुकीने गजबजला आहे कारण कोल्हापूर गगनबावडा रस्त्याचे कामकाज चालू असल्याने या मार्गावरून पर्यायी वाहतूक सुरू आहे परंतु रात्री अचानक पणे 16 टायरचा ट्रक क्रमांक केए-५२ एबी ४३५८रस्त्यावर रूतल्याने या मार्गावरील सर्व वाहतूक बंद झाल्याने वाहनधारकांमध्ये प्रचंड असंतोष निर्माण झालेला आहे.