कळे: आसगाव (ता.पन्हाळा) येथील चंद्रभागा प्रवीण पाटील (वय २२) या तरुण विवाहितेचा सीपीआरमध्ये प्रसूतीनंतर दुर्दैवी मृत्यू झाला. चंद्रभागा यांनी मुलीला जन्म दिला असून बाळ सुखरूप आहे. या घटनेने गावात हळहळ व्यक्त होत आहे.
साबळेवाडी (ता. करवीर) येथील चंद्रभागा यांचा वर्षभरापूर्वी प्रवीण पाटील यांच्याशी प्रेमविवाह झाला होता. शुक्रवारी बाळंतपणासाठी त्यांना कळे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. शनिवारी त्यांना पुढील उपचारासाठी कोल्हापूरच्या सीपीआर रुग्णालयात हलवण्यात आले. तेथे त्यांच्यावर शस्त्रक्रियेद्वारे प्रसूती करण्यात आली. मात्र त्यानंतर रक्तस्राव सुरूच राहिला. अतिरक्तस्रावामुळे उपचार सुरू असतानाच चंद्रभागा यांची प्राणज्योत मालवली.