कोल्हापूर: पोलीस दलातील पोलीस अधिकारी त्यांना सेवा बजावताना अनेक शारिरीक अडचणींचा त्रास सहन करावा लागतो. याकरीता पोलीस अधिकारी, अंमलदार यांची वेळोवळी वैद्यकिय तपासणी करणे गरजेचे असल्याने जिह्याचे पालकमंत्री तथा सार्वजनिक आरोग्य कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश अबिटकर तसेच योगेशकुमार गुप्ता, पोलीस अधीक्षक, कोल्हापूर यांचे मार्गदर्शनाखाली जिल्हयातील पोलीस अधिकारी, अंमलदार, मंत्रालयीन लिपीक व त्यांचे कुटूंबियांचे आरोग्य तपासणी शिबीराचे आयोजन करण्यात आले.अलंकार हॉल, पोलीस मुख्यालय, कोल्हापूर याठिकाणी इंडियन मेडिकल असोशिएशन शाखा कोल्हापूर यांचे सहयोगातून महाआरोग्य तपासणी शिबीराचे आयोजन करण्यात आले होते
सकाळी ११.३० वाजता मंत्री आबिटकर यांच्या शुभहस्ते आरोग्य तपासणी शिबिराचे उद्घाटन करण्यात आले. कार्यक्रमप्रसंगी योगेशकुमार गुप्ता, पोलीस अधीक्षक, कोल्हापूर यांनी प्रस्ताविक करुन पोलीस दलातील पोलीस अधिकारी, अंमलदार यांना कर्तव्य बजाविताना आरोग्याची काळजी राखणे किती महत्वाचे आहे हे सांगितले .
इंडियन मेडीकल असोशिएशन चे अध्यक्ष डॉ. आर. एम. कुलकर्णी यांनी डॉक्टर व पोलीस हे एकाच नाण्याचे दोन पैलू असून दोघांनाही आपली सेवा बजाविताना कोणत्याची वेळेची मर्यादा नसते हे अधोरेखित करून कामामुळे येणारा ताणतणाव हा दररोज व्यायाम, सकस आहार व वेळोवेळी आरोग्याची तपासणी यामुळे कसा कमी करता येईल याबाबत मार्गदर्शन केले. तसेच श्री. अमोल येडगे, जिल्हाधिकारी, कोल्हापूर यांनी पोलीस दलाने राबविलेल्या आरोग्य तपासणी शिबीराची प्रशंसा करून वेळोवेळी आरोग्य तपासणी करण्याबाबत महत्व उपस्थितांना सांगितले.
अध्यक्षीय भाषणामध्ये मंत्री प्रकाश आबिटकर यांनी मुख्यमंत्री प्रशासकिय गतिमानता अभियान कोल्हापूर या अंतर्गत जिल्हयातील जास्तीत जास्त लोकांची वैदयकिय तपासणी करून घेणे हा उद्देश असून त्याअंतर्गत जिल्हा पोलीस दलातील पोलीस अधिकारी, अंमलदार यांची वैदयकिय तपासणी हा अभिनव उपक्रम आजरोजी राबविण्यात आलेला असून इत्तर शासकिय विभागांमध्ये देखील कार्यरत असणारे सर्व अधिकारी, कर्मचारी यांची वैदयकिय तपासणी करण्याबाबत व्यापक कार्यक्रम राबविण्याची सुचना केली तसेच इंडियन मेडिकल असोशिएशन व कोल्हापूर जिल्हा पोलीस दलाने राबविलेल्या महाआरोग्य तपासणी शिबीराबाबत समाधान व्यक्त करून यापूढेही सदरचा उपक्रम अव्याहतपणे राबविण्याच्या सुचना दिल्या.
शिबीरामध्ये हृदयरोग तज्ज्ञ, जनरल सर्जरी, स्त्रीरोग तज्ञ, युरोलॉजिस्ट, दंतचिकित्सा, अस्थिरोग तज्ञ, त्वचारोग तज्ञ, पॅथॉलॉजी तपासणी इ. सुविधा एकाच छताखाली उपलब्ध करून देण्यात आलेल्या होत्या. नमुद तपासणी शिबीराचा लाभजिल्हा पोलीस दलातील एकुण ३९९ पोलीस अधिकारी, अंमलदार, मंत्रालयीन लिपीक तसेच त्यांचे कुटूंबियांना झालेला आहे.
तपासणी शिबीराच्या उदघाटन प्रसंगी निकेश खाटमोडे-पाटील, अपर पोलीस अधीक्षक, श्रीमती. सुवर्णा पत्की, पोलीस उप अधीक्षक, मुख्यालय, रविंद्र कळमकर, पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा, सुरजितसिंह राजपुत, पोलीस निरीक्षक, मोटार परिवहन विभाग, श्री. राजकुमार माने, राखीव पोलीस निरीक्षक, हणमंत काकंडकी, सहायक पोलीस निरीक्षक, कल्याण शास्त्रा, इंडियन मेडीकल असोशिएशनचे पदाधिकारी, डॉक्टर्स तसेच पोलीस अंमलदार, मंत्रालयीन लिपीक व त्यांचे कुटूंबिय मोठ्या संख्येने उपस्थित होते.