कळे: पन्हाळा तहसीलदार कार्यालयामार्फत कळे मंडळ अधिकारी कार्यालयाअंतर्गत छत्रपती शिवाजी महाराजस्व अभियान दाखले वाटप शिबिरात १४४ जणांना दाखले वाटप झाले. तहसीलदार माधवी शिंदे अध्यक्षस्थानी होत्या. धर्मराज मंदिरात कार्यक्रम पार पडला. संजय गांधी व श्रावणबाळ पास मंजूर लाभार्थी ३२, सर्व उत्पन्न व जातीचे डोमेसाईल दाखले ७५, महसूल विभाग प्रमाणपत्रे १६, सातबारा उतारे २१ इत्यादी वाटप करण्यात आले. सरपंच दिपाली पाटील, संभाजी कापडे, सुभाष पाटील, रणजीत तांदळे, ग्रामपंचायत अधिकारी नंदीप मोरे मंडल अधिकारी सुहास घोदे, ग्राम महसूल अधिकारी, कोतवाल धान्यवाटप दुकानदार, महा-ई-सेवा केंद्र चालक, ग्रामस्थ, लाभार्थी व खातेदार उपस्थित होते.