Wednesday, July 9, 2025
Google search engine
HomePOLITICALमाळेगाव साखर कारखाना निवडणुकीत अजित पवार विजयी; पहिला निकाल जाहीर

माळेगाव साखर कारखाना निवडणुकीत अजित पवार विजयी; पहिला निकाल जाहीर

बारामतीच्या राजकारणात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या बहुचर्चित निवडणुकीची मतमोजणी आज पार पडत आहेत. पहिला निकाल जाहीर झाला असून ब वर्ग सभासद प्रतिनिधी प्रवर्गातून निळकंठेश्वर पॅनलचे उमेदवार आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे विययी झाले आहेत. अजित पवार यांनी ९१ तर त्यांच्या विरोधी उमेदवाराला दहा मते पडले आहेत.

साखर कारखान्याची सत्ता मिळवण्यासाठी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह शरद पवारांचे जुने सहकारी चंद्रराव तावरे आणि शेतकरी संघटना अशी मिळून चार पॅनेल्स मैदानात उतरले आहेत. आता या निवडणुकीचा पहिला निकाल हाती आला असून ‘ब वर्ग गटातून’ उपमुख्यमंत्री अजित पवार हे विजयी झाले आहेत. १०२ पैकी १०१ मतं वैध होती, यातील अजित पवारांना ९१ मतं मिळाली आहेत. सहकारी संस्था या गटासाठी मतदान करतात. यामध्ये अजित पवारांनी बाजी मारली आहे. 

 माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीच्या मतदानाची आकडेवारी सकाळी सात ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत अ वर्गाची   ८८.४८ टक्के  मतदान झाले असून यामध्ये १२ हजार ८६२ पुरुषांनी मतदानाचा हक्क बजावला. तर ४ हजार ४३४ स्त्रियांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. १९ हजार ५४९ पैकी  एकूण १७ हजार  २९६ मतदारांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावलाय. तर ब प्रवर्गात ९९.०२ टक्के मतदान झाले आहे. १०२ मतदारांनीपैकी यामध्ये ९९ पुरुष आणि २ स्त्रियांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला आहे.

spot_imgspot_img
RELATED ARTICLES
Today Live News
Most Popular News