कोल्हापूर शहराच्या मध्यवर्ती परिसरातील म्हणजेच शाहुपूरी, कलेक्टर ऑफिस परिसर तसेच सदर बझार, विचारेमाळ परिसरामध्ये फाळकुट दादा म्हणून दहशत निर्माण झालेल्या आदित्य उर्फ गब्बर अमर सुर्यवंशी, रा. केव्हीज , नागाळापार्क, कोल्हापूर व त्याचे नेतृत्वाखालील ‘गब्बर गँग ‘ या संघटित गुन्हेगारीला जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आले आहे.
संघटनेचे सदस्य २) अनिकेत अमर सुर्यवंशी, रा. केव्होजपार्क, नागाळापाक, कोल्हापूर, ३) तुषार सिध्दु कुमठे, रा. शाहू कॉलेज समोर, सदर बझार, कोल्हापूर, ४) सुजल युवराज ढेरे, रा. न्यू पॅलेस, पाटील मळा, कोल्हापूर, ५) ओंकार कुमार समुद्र, रा. सदर बझार, विचारेमाळ, कोल्हापूर, ६) प्रतिक विजय नागांवकर, रा. १९२. इंवॉर्ड, सदर बझार, कोल्हापूर तसेच टोळी सदस्य तथा विधी संघर्षित बालक यांनी फिर्यादी यांना दि. २१ जून रोजी दुपारी ३.०० वाजताच्या सुमारास फिर्यादी श्रीनाथ गंगाराम कुचकोरवी, वय २८ वर्ष, रा. कावळानाका, कोल्हापूर त्यांचे मित्रा समवेत नागाळापार्क येथील महाविद्यालयाच्या जवळील हॉटेल समोर थांबले असता “गब्बर गैंग’चे सदस्यांनी शिवीगाळ केली व आदित्य कॉर्नर या ठिकाणी आले असता त्यावेळी त्यांना थांबवून टोळी सदस्यांनी “आमचा भाई गब्बर सूर्यवंशी यास तू कॉलेज समोर काय बोललास? तु सूर्यवंशी गँगला ओळखत नाहीस काय? आमची कोल्हापूरात दहशत आहे हे तुला माहिती नाही काय? आमच्या नादाला कोणी लागत नाही लक्षात ठेव” अशी दमदाटी,शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी मारहाण करुन मोटर सायकल वरुन खाली पाडले. गब्बर गंगचा प्रमुख आदित्य उर्फ गब्बर सूर्यवंशी याने फिर्यादी यांना ‘तुला जिवंत ठेवत नाही” असे म्हणून प्राणघातक तलवारीने जिवे ठार मारणेचे उद्देशाने वार करुन जखमी केले असे फिर्यादी श्रीनाथ गंगाराम कुचकोरवी, वय २८ वर्ष, रा. कावळानाका, कोल्हापूर यांनी फिर्याद दिलेने गुन्हा दाखल आहे.
सदरचा गुन्हा दाखल झालेनंतर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक योगेश कुमार यांनी गब्बर गँग या संघटित गुन्हेगारी टोळीचा आढावा घेतला त्यामध्ये टोळीचा सदस्य अनिकेत सुर्यवंशी व विधी संघषित बालक हे यापूर्वी “सुर्यवंशी गैंग’ नांवाने कुप्रसिद्ध असणारे टोळीमध्ये सक्रिय होते. हे सिद्ध झालेने त्याना गुन्ह्यामधे मोक्का अंतर्गत कारवाई केली आहे.
सदर ‘गब्बर गैंग’ या संघटित गुन्हेगारी संघटनेच्या गुन्हेगारी कृत्यांना बळी पडलेल्या पिडीत व्यक्तीना तक्रार दाखल करावयाची असलेस नजीकच्या पोलीस ठाणेशी किंवा शाहूपुरी पोलीस ठाणेशी संपर्क साधावा असे याव्दारे आवाहन करण्यात आले आहे.
या कारवाईमध्ये कोल्हापूर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक योगेश कुमार यांच्या नेतृत्वाखाली अपर पोलीस अधीक्षक, कोल्हापूर डॉ.बो. धिरजकुमार, उपविभागीय पोलीस अधिकारी, शहर उपविभाग, कोल्हापूर श्रीमती प्रिया पाटील, यांचे मार्गदर्शनाखालील शाहुपूरी पोलीस ठाणे पोलीस निरीक्षक संतोष डोके व त्यांचेकडील पोहवा संजय जाधव, शहर उपविभाग कार्यालयाकडील पोहवा इनामदार, पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा, कोल्हापूर रविंद्र कळमकर व त्यांचेकडील सहा. फौज, सचिन पार्वती सुर्याजी पाटील यांनी ही मोठी कामगिरी पार पाडली.