Wednesday, October 8, 2025
Google search engine
HomeEducationराज्यातील अतिवृष्टीमुळे अकरावीच्या प्रवेशासाठी अंतिम संधी; ४ ते ६ ऑक्टोबर दरम्यान अर्ज...

राज्यातील अतिवृष्टीमुळे अकरावीच्या प्रवेशासाठी अंतिम संधी; ४ ते ६ ऑक्टोबर दरम्यान अर्ज सादर करण्याचे आवाहन

मुंबई: राज्यात झालेल्या अतिवृष्टी आणि पूरपरिस्थितीच्या पार्श्वभूमीवर, तसेच विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर आणि शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांच्या ३० सप्टेंबर २०२५ रोजी झालेल्या बैठकीत दिलेल्या सूचनांनुसार, महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालनालयाने अकरावीच्या ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेसाठी अंतिम संधी जाहीर केली आहे.

ही अंतिम विशेष फेरी ४ ऑक्टोबर सकाळी १० वाजल्यापासून ६ ऑक्टोबर दुपारी ३ वाजेपर्यंत उपलब्ध असेल, अशी माहिती शिक्षण संचालक (माध्यमिक) डॉ. महेश पालकर यांनी दिली असून, विद्यार्थ्यांनी, पालकांनी आणि कनिष्ठ महाविद्यालयांच्या प्राचार्यांनी याची नोंद घ्यावी, असे आवाहन त्यांनी केले आहे.

महत्त्वाचे वैशिष्ट्ये:

  • विद्यार्थ्यांना या कालावधीत नवीन नोंदणी, प्राधान्यक्रम भरणे किंवा आधी भरलेल्या प्राधान्यक्रमात बदल करण्याची अंतिम संधी मिळणार आहे.

  • या फेरीत ज्या विद्यार्थ्यांना महाविद्यालय अलॉट होणार नाही, अशा विद्यार्थ्यांसाठी पुढे रिक्त जागांवर आधारित विकल्प बदलण्याची सुविधा दिली जाईल.

  • त्या आधारावर पुन्हा गुणानुक्रमाने महाविद्यालयाचे अलॉटमेंट होईल.

  • ज्यांना एकदा अलॉटमेंट झाले आहे, त्यांना पुढे विकल्प बदलण्याची संधी मिळणार नाही.

  • प्रत्येक टप्प्यावर वेळेवर विकल्प न भरल्यास, संबंधित विद्यार्थ्यांचा पुढील प्रवेश प्रक्रियेत विचार केला जाणार नाही.

  • सर्व टप्पे पूर्ण झाल्यानंतर एकाचवेळी अलॉटमेंट जाहीर करण्यात येणार असून, प्रत्यक्ष प्रवेश घेण्याचे वेळापत्रक ७ ऑक्टोबरनंतर प्रसिद्ध होईल.

ही अकरावी ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेची अंतिम संधी आहे. यानंतर कोणतीही अतिरिक्त फेरी घेतली जाणार नाही.

विद्यार्थ्यांनी अधिक माहितीसाठी अधिकृत पोर्टल https://mahafyjcadmissions.in ला भेट द्यावी, ई-मेल: support@mahafyjcadmissions.in किंवा हेल्पलाईन क्रमांक: ८५३०९५५५६४ वर संपर्क साधावा, असे आवाहन राज्य शिक्षण संचालनालयाकडून करण्यात आले आहे.


spot_imgspot_img
RELATED ARTICLES
Today Live News
Most Popular News