स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडील सर्व पोलीस अधिकारी व अमंलदार यांची पथके तयार करून कोल्हापूर जिल्हयातील अवैद्य व्यवसायाबाबत माहिती घेऊन त्याविरुद्ध कारवाई करणेचे सत्र सुरु आहे.
दि. 04 ऑक्टोबर रोजी पोलीस अमंलदार योगेश गोसावी यांना बातमी मिळाली की, गोवा बनावटीची दारु रेनॉल्ट डस्टर गाडी क्रमांक एम. एच. 10-सी.ए.8211 या गाडीमधून भरून ती गाडी भोगावती मार्गे कोल्हापुरच्या दिशेने येत आहे.त्याप्रमाणे पोलिसांनी रोडवर सापळा लावून भोगावतीकडून कोल्हापूर शहराचे दिशेने येणाऱ्या राधानगरी रोडवर द स्पाइस हॉटेल समोर रेनॉल्ट डस्टर ची तपासणी केली. गाडीमध्ये मॅगडॉल्स नंबर 1 व रॉयल स्टॅग व्हिस्की कंपनीच्या गोवा बनावटीच्या विदेशी दारूचे बॉक्स मिळुन आले. सदर गाडीतील शुभम शिवकुमार साळुंखे, व.व. 28 व आशितोष हिंदुराव साळुंखे, व.व.27, दोघे रा. वॉर्ड नं.1 जाधवनगर आंधळी पलूस, ता. पलूस, जि. सांगली यांचेसह गाडी ताब्यात घेतली. गाडीमध्ये मॅगडॉल्स नं. 1 कंपनीची 180 मिलीचे गोवा बनावटीचे विदेशी दारुचे 06 बॉक्स व रॉयल स्टॅग व्हिस्की कंपनीची 180 मिलीचे गोवा बनावटीचे विदेशी दारूचे 06 बॉक्स असा एकूण 7लाख 51हजार 840 रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
सदरची कारवाई पोलीस उपनिरीक्षक संतोष गळवे, पोलीस अमंलदार योगेश गोसावी, प्रदीप पाटील, गजानन गुरव, वैभव पाटील, विजय इंगळे, शिवानंद स्वामी, संजय पडवळ यानी केलेली आहे.