कसबा बावडा :
डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाच्या सेंटर फॉर इंटरडिसिप्लिनरी स्टडीजच्या स्टेम सेल अॅण्ड रिजनरेटिव्ह मेडिसिन विभागातील संशोधकांनी एक क्रांतिकारी शोध लावला आहे. त्यांनी ‘सुपर बोन ग्लू’ विकसित केला असून, याच्या मदतीने केवळ दोन मिनिटांत तुटलेली हाडं आणि गंभीर फ्रॅक्चर सहज जोडता येतात.
हा ग्लू जखम झालेल्या त्वचेला भरून काढण्यासाठीही प्रभावी ठरतो, असे संशोधकांचे म्हणणे आहे.
संशोधनकर्ते :
हा प्रकल्प संशोधक विद्यार्थिनी नीकिता अमर शिंदे आणि सहयोगी प्राध्यापक डॉ. शिवाजी बी. कास्टे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला. संशोधन संचालक आणि अधिष्ठाता प्रा. सी. डी. लोखंडे यांचे मोलाचे मार्गदर्शन त्यांना लाभले.
या उल्लेखनीय संशोधनाबद्दल कुलपती डॉ. संजय डी. पाटील, उपाध्यक्ष आमदार सतेज डी. पाटील, विश्वस्त ऋतुराज पाटील, पृथ्वीराज पाटील, कुलगुरू डॉ. आर. के. शर्मा, आणि कुलसचिव डॉ. व्ही. व्ही. भोसले यांनी संशोधकांचे अभिनंदन केले