कोल्हापूर: कोल्हापूरातील भोई गल्ली बिंदू चौक येथे राहणारा जावेद बागवान हा इनोव्हा गाडी क्र एम एच 12 एच टी 2421 मधुन अवैद्य गुटखा घेवून येणार असल्याची माहिती सहा. पोलीस निरीक्षक सागर वाघ यांच्या पथकास मिळाली. या माहितीचे अनुषंगाने दि. 05 ऑक्टोबर रोजी रात्रीच्या वेळी पोलिस पथकाने भोई गल्ली बिंदु चौक कोल्हापूर येथे सापळा लावून अवैधरित्या गुटखा वाहतुक करणाऱ्या जावेद मलीक बागवान, वय 38 यास त्याच्या टोयोटा कंपनीच्या इनोव्हा गाडी क्र एम एच 12-एच टी 2421 सह पकडले. त्याच्याकडून आर. एन सेंटेड सुपारी, आर एन सेंटेड तंबाखू, एम4 रॉयल जाफराणी जर्दा, आर.एम.डी. पान मसाला, मुसाफिर पान मसाला, एम सेंटेड टोबॅको गोल्ड, V-1 टोबॅको, रजनीगंधा फ्लेवर्ड पान मसाला, विमल केशरयुक्त पान मसाला तसेच इतर साहित्य असा एकूण 10 लाख 74 हजार 260 रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला .
सदरची कारवाई ही स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर, सहा. पोलीस निरीक्षक सागर वाघ, पोलीस अमंलदार अमित सर्जे, सुरेश पाटील, रामचंद्र कोळी, विनोद कांबळे, रुपेश माने व संजय पडवळ यांनी केली आहे.