साळवण :
“ आजच्या काळात अनेक प्रकारचे आजार बळावत असताना स्त्रियांनी स्वसंरक्षणाबरोबरच स्वआरोग्य तपासणी करावी व निरामय आयुष्य जगावे” असे मत कोल्हापूर कॅन्सर सेंटरचे डॉ. सुरज पवार यांनी व्यक्त केले. ते तिसंगी (ता.गगनबावडा) येथील म.ह.शिंदे महाविद्यालयात
महादेव हरी शिंदे यांच्या ३० व्या स्मृतिदिनानिमित्त प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलत होते. यावेळी आमदार चंद्रदीप नरके हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थापक पी.जी. शिंदे होते.
प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते म. ह. शिंदे यांच्या
प्रतिमेचे पूजन झाले. प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना आमदार चंद्रदीप नरके म्हणाले, “ गतकाळातील व्यक्तीनी केलेल्या राजकीय, सामाजिक कार्याची जाणीव आजच्या तरुणांनी ठेवली पाहिजे. कारण सर्वसामान्य माणसाशी असणारी नाळ ही अधिक घट्ट असते.”
यावेळी मान्यवरांच्या हस्ते जिल्हास्तरीय मॅरेथॉन स्पर्धेतील विजेत्यांना बक्षीस देण्यात आले.मुले: प्रथम क्रमांक- ऋषिकेश माळकर, द्वितीय क्रमांक- ओंकार पाटील, तृतीय क्रमांक- धनाजी घुरखे, उत्तेजनार्थ – सागर शेळके
मुली : प्रथम क्रमांक- सुजाता पाटील, द्वितीय क्रमांक- प्रांजली मार्गे, तृतीय क्रमांक – सिद्धीका रावण, उत्तेजनार्थ –
सुजाता कुपले.
या कार्यक्रमासाठी कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरख शिंदे, कुंभी कासारी सहकारी बँकेचे चेअरमन अजित नरके, कोल्हापूर कॅन्सर सेंटरचे संदीप पाटील, पंचायत समितीचे माजी सभापती एकनाथ शिंदे, संस्थेचे सचिव स्वप्नील शिंदे, खजिनदार बंडोपंत पाटील, संचालक आनंदा पाटील, लहू गुरव,
नंदकुमार पवार आदी मान्यवर प्रमुख उपस्थित होते. यावेळी संजय शिंदे,आनंदा पाटील,डॉ.संदीप पाटील यांनी आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी अध्यक्षीय मनोगत पी.जी.शिंदे यांनी व्यक्त केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागत प्राचार्य डॉ.आर. एस.पोंदे यांनी केले. आभार डॉ.शिल्पा शिंदे यांनी केले. डॉ. एस. ए.मोरे, डॉ. एस. के. मेंगाने यांनी सूत्रसंचालन केले.
या कार्यक्रमानंतर कॅन्सर जनजागृती व तपासणी शिबिर पार पडले. यानंतर होम मिनिस्टर हा कार्यक्रम विशाल बेलवळेकर पाटील यांनी पार पाडला. यामध्ये गगनबावडा तालुका आणि परिसरामधील पाचशे महिलांनी यामध्ये सहभाग घेतला. त्यांना आकर्षक अशी बक्षिसे मान्यवरांच्या हस्ते देण्यात आली.