बालिंगा /वार्ताहर.
करवीर तालुका ग्रामपंचायत अधिकारी युनियन DNE 136 च्या अध्यक्षपदी राजेंद्र गाढवे यांची तर सचिवपदी शिवाजी वाडकर यांची बिनविरोध निवड करण्यात आली. कोल्हापूर जिल्हा परिषद कर्मचारी सोसायटी येथे आज झालेल्या
महाराष्ट्र राज्य युनियन DNE. 136 जिल्हा शाखा कोल्हापूर व करवीर तालुका ग्रामपंचायत अधिकारी युनियन DNE. 136 च्या वतीने घेण्यात आलेल्या बैठकीत विभागीय उपाध्यक्ष आनंदा तळेकर, जिल्हाध्यक्ष बाबासाहेब कापसे, जिल्हा सरचिटणीस अभिजीत चौगुले, माजी चेअरमन ग्रामपंचायत अधिकारी पतसंस्था कोल्हापूर अजित राणे, काकासाहेब पाटील, आर के पाटील. यांच्या समवेत झालेल्या बैठकीत करवीर तालुकाग्रामपंचायत अधिकारी युनियन नूतन कार्यकारणीची निवड करण्यात आली.
अन्य कार्यकारणी अशी : उपाध्यक्ष गायत्री जाखलेकर, कार्याध्यक्ष पांडुरंग मेंगाने, सहसचिव शरद पाटील, कोषाध्यक्ष दत्तात्रय धनगर, प्रसिद्धी प्रमुख सम्राट रानगे, कायदेशीर सल्लागार अजित जगताप, संघटक राहुल खोत, महिला संघटक अस्मिता कांबळे, तबस्सूम अत्तार, तबस्सूम मुल्ला आदींची बिनविरोध निवड करण्यात आली.
या निवडीसाठीकोल्हापूर जिल्हा ग्रामपंचायत अधिकारी युनियन संघटनेचे पदाधिकारी, करवीर तालुक्यातील ग्रामपंचायत अधिकारी वर्ग मोठया संख्येने उपस्थित होता. यावेळी नुतन जिल्हा कार्यकारणी व करवीर तालुकाग्रामपंचायत अधिकारी युनियन नुतन अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव व सर्व पदाधिकारी यांचे शाल व फुलांचे रोप देऊन सत्कार करण्यात आला.