Wednesday, October 8, 2025
Google search engine
HomePOLITICALशेतकऱ्यांसाठी राज्य सरकारने अखेर मदतीचे मोठे पॅकेज..

शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारने अखेर मदतीचे मोठे पॅकेज..


मुंबई – अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारने अखेर मदतीचे मोठे पॅकेज जाहीर केले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, शेतकऱ्यांच्या मदतीसाठी ३१,६२८ कोटी रुपयांचे पॅकेज जाहीर करण्यात आले आहे.

मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट केले की, हा निधी शक्यतो दिवाळीपूर्वीच शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. ही घोषणा मंत्रिमंडळ बैठकीनंतर मुख्यमंत्री फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी संयुक्त पत्रकार परिषदेत केली.

राज्यातील अनेक भागांत अतिवृष्टीमुळे शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे खरडून गेलेल्या जमिनीसाठी प्रती हेक्टर ४७ हजार रुपये मदतीची तरतूद करण्यात आली आहे.


spot_imgspot_img
RELATED ARTICLES
Today Live News
Most Popular News