दोनवडे : (प्रतिनिधी)
महिला महाविद्यालय कसबा बीड यांच्या वतीने
३ ऑक्टोबर ‘अभिजात मराठी भाषा सप्ताह ‘ निमित्त विनोद सादरीकरण ‘ स्पर्धा सोमवारी दि. ४ ऑक्टोबर २०२४ रोजी उत्साहात पार पडल्या. स्पर्धेमध्ये २० स्पर्धक विद्यार्थिनींनी सहभाग घेतला होता. महिला महाविद्यालयाचे प्राचार्य एन. एम. पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रम समन्वयक सहा. प्रा. वाय.एस.पाटील यांनी प्रास्ताविक केले. स्वागत कार्यक्रम संयोजक सहा. प्रा. तन्वी पाटील यांनी केले. नावीन्यपूर्ण अशा या स्पर्धेमध्ये विद्यार्थिनींनी विविध विनोदांचे सादरीकरण करून सर्वांना मनमुराद हसविले. सहा. प्रा. ए.बी. बाबर, सहा. प्रा. कोमल पाटील यांनी यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले. सूत्रसंचालन प्रा. मंजुषा कटाळे यांनी केले तर आभार सहा.प्रा. संचित कमलाकर यांनी मानले. यावेळी सहा. प्रा. शिवानी सूर्यवंशी, मयुरी यादव, भाग्यश्री सुतार, दीपाली सावंत यांचेसह विद्यार्थिनी, कर्मचारी उपस्थित होते.