Saturday, December 6, 2025
Google search engine
HomeSocialदोनशे पन्नास पेक्षा अधिक गरजू व गरजवंतांची दिवाळी आनंदात साजरी शिपुगडे दांपत्यांचा...

दोनशे पन्नास पेक्षा अधिक गरजू व गरजवंतांची दिवाळी आनंदात साजरी शिपुगडे दांपत्यांचा सामाजिक उपक्रम.

मोहन कांबळे बालिंगा प्रतिनिधी :
गेल्या कित्येक वर्षांपासून श्री विजय शिपुगडे व सौ.शितल शिपुगडे आपल्या घरातील प्रत्येक व्यक्तीचा वाढदिवस एक सामाजिक बांधिलकी समजुन उतरेश्वर थाळीच्या माध्यमातून सकस आहार दान करीत असतात त्याच बरोबर जेंव्हा पुरस्थीती निर्माण झाली होती त्या-त्या वेळी हणमंतवाडी येथील पुरग्रस्थ बांधवांना सढळहस्ते मदत करुन पुर ओसरेपर्यंत अन्नदान करीत असतात तेही स्वतः पुरग्रस्थ असतांनाही.
अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत शिक्षण घेवुन समर्थ इंजिनिअरींगची स्थापणा करून बॉयलर रिपेअरिंगची कामे व जेट स्प्रे कामे करीत श्री विजय शिपुगडे व त्यांच्या धर्मपत्नी सौ.शितल शिपुगडे हे सामाजिक उपक्रम राबवित आहे.
आज सर्वत्र दिपावली सण उत्साहात साजरा होत असतांना गरीब व गरजु लोकांनी काय करायचे या विचाराने प्रेरित होवुन नवीन कपडे,साडी,फराळसुगंधी तेल ,उटणे,व मोती साबण यांचा एकत्रित पाकिटे करून गंगावेश परिसरात उतरेश्वर थाळीचे माध्यमातून आज वाटप केले या कामी उतरेश्वर थाळी परिवाराचे त्यांना मोलाचे सहकार्य लाभले.
त्यांच्या या दातृत्वगुणांने गरजु व गरजवंतांचे चेह-यावर आज आनंद ओसांडून वहात होता या मुळे या परिसरात श्री विजय शिपुगडे व सौ. शितल शिपुगडे यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

spot_imgspot_img
RELATED ARTICLES
Today Live News
Most Popular News