Saturday, December 6, 2025
Google search engine
HomePOLITICALआमदार चंद्रदीप नरके व पी एन पाटील यांचे सुपुत्र राहुल पाटील एकत्र...

आमदार चंद्रदीप नरके व पी एन पाटील यांचे सुपुत्र राहुल पाटील एकत्र !

दोनवडे (श्रीकांत पाटील):

करवीर तालुक्यात आगामी जिल्हा परिषदेचे वारे वाहू लागले आहे. आगामी जिल्हा परिषद निवडणुका डोळ्यासमोर ठेवून आमदार चंद्रदीप नरके व माजी गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांच्यात खरी चुरस होणार आहे. यामध्ये नुकतेच राष्ट्रवादी अजित पवार गटात प्रवेश केलेले राहुल पाटील यांची
भूमिका काय असेल? याविषयी मतदारसंघात चर्चा सुरू आहे. या दोघांना एकत्र बसून जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या महायुतीच्या जागावाटप करण्याबाबत वरिष्ठ नेत्यांकडून प्रयत्न सुरू आहेत. राहुल पाटील यांनी काँग्रेस  पक्ष सोडून राष्ट्रवादी काँग्रेसची वाट धरलेली आहे व त्यांना उभरत्या राजकारणात कितपत यश मिळते ते आता  पहायचंय. सद्यस्थितीत आमदार चंद्रदीप नरके व काँग्रेसचे निष्ठावंत आमदार व माजी जिल्हाध्यक्ष पी एन पाटील त्यांचे सुपुत्र राहुल पाटील एकत्र येणार आहेत. महायुतीत या दोघांनी प्रवेश केला आहे पुढचं राजकारण काय असेल राहुल पाटील आणि नरके एकमेकांना मदत करणार का? जिल्हा परिषद कशी लढवणार? त्याची चर्चा जिल्ह्यात सुरू आहे.

आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूकीच्या निमित्ताने गटातटामध्ये ईर्ष्या सुरू झाली आहे. करवीर तालुक्यात महायुती विरुद्ध आमदार सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी अशीच लढत होणार आहे महायुतीची सत्ता आणण्यासाठी नेत्यांनी आता नरके आणि राहुल पाटील यांचे मनोमिलन व्हावे असे प्रयत्न सुरू केले आहेत राष्ट्रवादीचे नेते मंत्री हसन मुश्रीफ यांनी एका समारंभात बोलताना नरके व राहुल पाटील एकत्र चहा पितील असे बोलून या दोघांना एकत्र आणण्याचे संकेत दिले आहेत.

काँग्रेसचे राहुल पाटील यांनी अजितदादा यांच्या राष्ट्रवादी पक्षात प्रवेश केला आहे तर आमदार चंद्रदीप नरके हे शिवसेना गटात आहेत.  दोघानाही युती धर्म पाळावा लागणार आहे .पण हे दोघे अद्यापही एकत्र आलेले नाहीत त्यांना एकत्र आणण्यासाठी आता वरिष्ठ पातळीवरून आता चर्चा सुरू आहे.

त्यामुळे थोड्याच दिवसात या दोघांच्यातील मनोमिलनाचे स्पष्ट संकेत मिळणार आहेत.
स्थानिक स्वराज्य संस्था त्यांच्या निवडणुका स्वतंत्र लढवण्याची दोघांनीही घोषणा केली आहे मग पुढचं राजकारण कसे असेल याची उत्सुकता सर्वांना लागलेली आहे. दोघे एकत्र येणार का ?का त्यांच्यात ताटातूट होणार? हे आता पाहायला मिळेल या दोघांमध्ये मैत्रीपूर्ण लढत होईल का? हा पण प्रश्न आहे पाहूया…

spot_imgspot_img
RELATED ARTICLES
Today Live News
Most Popular News