दोनवडे (श्रीकांत पाटील ):
जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक कार्यक्रम सुरू होण्या आगोदरच सत्तारूढ महायुती मध्ये उमेदवार निश्चित करण्यावरून धुसफूस सुरु झाली आहे. काँग्रेसने उमेदवारांची चाचपणी सुरु केली आहे. गरजेनुसार महाविकास आघाडीतील पक्षांनाही सहभागी करून घेण्याची त्यांची व्युहरचना आहे.
सतारूढ भाजप , शिवसेना शिंदे गट व राष्ट्रवादी अजित पवार गटाने तर स्वबळाची तयारी सुरू केली आहे. त्यांच्यामध्ये मैत्रीपूर्ण लढत आता जवळजवळ निश्चित आहे. निकाला नंतर सत्ता स्थापना करताना पुन्हा एकत्र येउन महायुतीचा झेंडा जिल्हा परिषद व पंचायत समितीवर फडकवण्याचा त्यांचा मानस आहे. राजकीय पक्षांच्या या धोरणा बाबत मतदार राजा मात्र बुचकळ्यात पडला आहे. एका व्यासपीठावरून विरोधकाना आरोपासह शिव्याशाप देणारे आता या निवडणुकीत राजकीय मैदानात एकमेकां विरूद्ध लढणार आहेत.
कोल्हापूर जिल्ह्यात काँग्रेसची धुरा नेते आमदार सतेज पाटील यांच्यावर आहे.त्यांनी गेल्या वर्षांपासून या निवडणुकीची जिल्ह्यात तयारी केली आहे. सतेज पाटील यांचा वारू रोखण्यासाठी महायुती सज्ज झालीआहे. त्यांना शह देण्यासाठी भाजप नेत्यांनी महायुती नेतृत्वाची साथ घेतली आहे.
तथापि महायुतीच्या वरिष्ठ नेतृत्वानी ठरवले प्रमाणे आता मैत्रीपूर्ण लढती आता निश्चित आहेत. युतीतील तीनही पक्षाचे नेते कामाला लागले आहेत.उमेदवारी चाचपणी सुरू झाली आहे. त्यामुळे आगामी जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीत उमेदवार स्वबळावर उमेदवार असले तर आश्चर्य वाटायचे कारण नाही.