लोटेवाडी (ता. भुदरगड) – लोकशाहीर गणपती कृष्णा सातपुते यांच्या शाहिरी कलेचा वारसा नव्या पिढीने जतन करावा, असे प्रतिपादन सुप्रसिद्ध शाहीर नामदेव निकम यांनी केले.
या कार्यक्रमासाठी कोल्हापूर जिल्ह्यातील जेष्ठ कलगीवाले, तुरेवाले तसेच युवा शाहिरांनी उपस्थिती लावली होती. एकूण ४६ जेष्ठ व नवोदित शाहिरांनी शाहिरी प्रबोधनाच्या माध्यमातून आपल्या कलेचा ठसा उमटविला.
कार्यक्रमात शाहीर गणपती सातपुते यांच्या अमोघ वाणीचा, पहाडी आवाजाचा आणि कलेसाठी आयुष्यभर केलेल्या समर्पणाचा उल्लेख अनेक शाहिरांनी आपल्या शाहिरी सादरीकरणातून भावपूर्ण शब्दांत केला. प्रत्येक शाहिराने या निमित्ताने आपली कला रसिकांसमोर सादर केली.
या प्रसंगी शाहीर नामदेव निकम, रविंद्र दबडे, सुभाष तोंदले, संजय देसाई, दिलीप गणपुले, संजय मोहिते, बंडेराव कांबळे, रामदास सातपुते, मारुती केसकर, किरण पोवार, सागर चौगुले, विठ्ठल कांबळे, आनंदा कुरळे, सात्तप्पा गुरव, युवराज मालप, बाळासो कांबळे, महादेव काशिलकर, बाळासाहेब कांबळे, रंगराव पाटील, संजय इंगळे, परसु कांबळे, बचाराम इंगळे, लक्ष्मण कांबळे, शाहीर धोंडीराम नलवडे सर, शिवाजी सारंग, बबन खवरे, आनंदा सारंग, बाजीराव सातपुते, बबन सातपुते आदी मान्यवर उपस्थित होते.
वाद्यवृंदात पेटी वादक बाळू शिंदे व मारुती पाटोळे, तसेच ढोलकी वादक प्रकाश कांबळे, स्वप्निल चव्हाण, रवी कांबळे, दत्ता कांबळे व रामदास सातपुते यांनी उत्कृष्ट साथ दिली. सर्व उपस्थित शाहीरांचा स्मृतिचिन्ह व मानधन देऊन सन्मान करण्यात आला.
प्रास्ताविक व स्वागत मोहन सातपुते यांनी केले, तर आभार प्रदर्शन कुंडलिक शिर्सेकर यांनी मानले.