Saturday, December 6, 2025
Google search engine
Homecrimeइचलकरंजीत अवैध गुटखा साठ्यावर पोलिसांचा छापा; 1.71 लाखांचा मुद्देमाल जप्त

इचलकरंजीत अवैध गुटखा साठ्यावर पोलिसांचा छापा; 1.71 लाखांचा मुद्देमाल जप्त


 

इचलकरंजी (प्रतिनिधी) – आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील अवैध धंद्यांवर आळा घालण्यासाठी पोलीस अधीक्षक श योगेश कुमार गुप्ता यांनी सर्व पोलिसांना प्रभावी कारवाईच्या सूचना दिल्या आहेत. त्यानुसार स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक  रविंद्र कळमकर यांनी विविध पथकांना अवैध धंदे शोधून काढण्यासाठी रवाना केले होते.

या मोहिमेअंतर्गत पोलीस उपनिरीक्षक संतोष गळवे यांच्या पथकाला गुप्त माहिती मिळाली की, इचलकरंजी येथील इंदिरानगर, गल्ली नं. ३ येथे राहणारा वसीम यूनुस तांबोळी (वय 29) हा आपल्या घरात गुटखा, पान मसाला व सुगंधी तंबाखूचा साठा करून विक्री करत आहे. महाराष्ट्र राज्यात गुटखा विक्रीवर बंदी असतानाही हा अवैध धंदा सुरू असल्याची खात्री झाल्यानंतर पोलिसांनी त्या ठिकाणी छापा टाकला.

कारवाईदरम्यान पोलिसांनी विविध कंपनींचा सुगंधी तंबाखू, पान मसाला, सुपारी व सुगंधी जर्दा असा एकूण ₹1 लाख 71 हजार 710  किंमतीचा मुद्देमाल जप्त केला. 

सदरची कारवाई  स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक  रविंद्र कळमकर, पोलीस उपनिरीक्षक संतोष गळवे, तसेच पोलीस अंमलदार वैभव पाटील, महेश पाटील, विशाल चौगले, संतोष बरगे, राजू कोरे व सागर चौगले यांच्या पथकाने केली.

या कारवाईमुळे इचलकरंजी परिसरातील अवैध गुटखा व्यापाराला मोठा धक्का बसला असून, पुढील दिवसांतही अशीच कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.


spot_imgspot_img
RELATED ARTICLES
Today Live News
Most Popular News