पन्हाळा प्रतिनिधी- पन्हाळगडावर महाराजांच्या मंदिरात पौर्णिमेची आरती नेहमीप्रमाणे उत्साहात पार पडली. महाराष्ट्रातील गिरीदुर्गावरील हे एकमेव शिवछत्रपती मंदिर असल्याने येथील परंपरेला वेगळे ऐतिहासिक महत्त्व प्राप्त झालेले आहे. तेरा वर्षे नवीन युवक सेनेच्या वतीने दर पौर्णिमेला सकाळी नियमित होणारा जागर यावेळी न चुकता आनंदात आणि उत्साहात पार पडला.
कार्यक्रमाला अण्णा ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष शशिकांत मोरे, राजश्री शाहू महाराज शिक्षण मंडळाचे संस्थापक प्राध्यापक डॉक्टर विशाल साजणीकर, इचलकरंजीचे सामाजिक कार्यकर्ते प्रकाश बारकाळे, आरळेचे शिक्षण मंडळाचे माजी अध्यक्ष पिंटू राज आवड ,हे प्रमुख पाहुणे उपस्थित होते. मान्यवरांनी प्रथम मंदिरातील मूर्तीला अभिषेक व पुष्पहार अर्पण केला. त्यानंतर प्रेरणा मंत्र, ध्येय मंत्र, आणि शिवसुर्य हवन मंत्र, सामूहिकरीत्या पठण करण्यात आले .इचलकरंजीचे संतोष कांदेकर यांनी सादर केलेली शिव आरती हा कार्यक्रमाचा केंद्रबिंदू ठरला तर आरती नंतरची फटाक्यांची आताशबाजी वातावरणामध्ये रंग भरून गेली.
मंदिराची पुष्प सजावट पुंडलिक-बिरं जे, जयसिंग चौगुले, विशाल धुमाळ यांनी केलेली होती. प्राध्यापक आनंद गिरी ,थोरबोले सर, रमेश खोपकर ,नानासाहेब मोरे, नागेश यादव, डॉक्टर अमर जाधव, महेश भोसले, यांच्यासह शिवभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.