दोनवडे : श्रीकांत पाटील
नगरपालिका व नगरपरिषद यांच्या निवडणुका झाल्यानंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लागणार आहेत. जिल्ह्यातील सर्वच तालुक्यात माहिती व महाविकास आघाडी यांनी आपलेच वर्चस्व राहावे यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत करवीर तालुक्यातील परिस्थिती आहे आपलेच वर्चस्व राहावे यासाठी दोन्हीकडूनही प्रयत्न होत आहेत. करवीर तालुक्यात आमदार चंद्रदीप नरके व माजी जिल्हा परिषद अध्यक्ष राहुल पाटील त्यांच्यातच थेट लढत असल्याचे पहायला मिळणार आहे. दोघांनीही करवीर तालुक्यावर वर्चस्व राहावे यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. राहुल पाटील यांनी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला असला तरी महायुती त्यांच्या पचनी पडणार का? हा पण प्रश्न आहे. सद्यस्थितीत पाडळी खुर्द हा जिल्हा परिषद मतदारसंघ नवीनच अस्तित्वात आला आहे. यामुळे अनेकांनी गुडघ्याला बाशिंग बांधले आहे. घोडं मैदान लांब नाही पाहूया काय होतंय!
कोल्हापूर जिल्ह्यातील 68 गटापैकी करवीर तालुक्यात बारा गट आहेत. त्यामुळे हा तालुका महत्त्वाचा मानला जातो या तालुक्यावर आपले वर्चस्व राहावे यासाठी सर्वच नेत्यांनी प्रयत्न केले आहेत आणि तशी फिल्डिंगही त्यांनी लावली आहे.
करवीर तालुक्यात जिल्हा परिषदेचे बारा गट आहेत गोकुळ शिरगाव, वडणगे, उचगाव, पाचगाव, सडोली खालसा, पाडळी खुर्द निगवे खालसा हे जिल्हा परिषद मतदार संघ सर्वसाधारण प्रवर्गासाठी आरक्षित झाले आहेत.
कळंबे तर्फ ठाणे सांगरूळ व शिंगणापूर हे जिल्हा परिषद मतदार संघ सर्वसाधारण महिलासाठी आरक्षित झाले
शिये, गडमुडशिंगी हे जिल्हा परिषद गट ओबीसी गटासाठी राखीव आहे
2017 च्या निवडणुकीत करवीर तालुक्यात काँग्रेस सत्ता होती दिवंगत काँग्रेसचे माजी कोल्हापूर जिल्हाध्यक्ष व माजी आमदार पी. एन. पाटील करवीर तालुक्याच्या राजकारणात चांगलीच पकड होती सद्यस्थितीत त्यांच्या निधनानंतर करवीर तालुक्यात प्रभावी नेता राहिलेलाच नाही हीच संधी आमदार चंद्रदीप नरके यांनी घेतली आहे. करवीर तालुका आपल्या ताब्यात कसा राहावा यासाठी दोन्हीकडूनही प्रयत्न होत आहेत.
करवीर तालुक्याच्या दक्षिणचे वडणगे व शिये हे जिल्हा परिषद मतदार संघ काबीज करण्यासाठी माहिती कामाला लागली आहे. महायुतीची धुरा खासदार धनंजय महाडिक अमल महाडिक आमदार चंद्रदीप नरके यांच्यावर आहे सद्यस्थितीत महायुतीचेच पारडे जड दिसत आहे.
महाविकास आघाडीची धुरा खासदार छत्रपती शाहू महाराज व आमदार सतेज पाटील या दोघावरच आहे. करवीर चा किल्ला लढवण्यासाठी या दोघांवरच वेळ आली आहे जिल्हा परिषद निवडणुकीसाठी दमदार उमेदवार महाविकास आघाडीला शोधावे लागणार आहेत त्यासाठी आमदार सतेज पाटील व छत्रपती शाहू महाराज यांचे कसब लागणार आहे.



