Saturday, December 6, 2025
Google search engine
HomePOLITICALपालकमंत्री प्रकाश आबिटकर, आ. राजेश क्षीरसागर,आ. अमल महाडिक यांनी घेतली अमृत पाटील...

पालकमंत्री प्रकाश आबिटकर, आ. राजेश क्षीरसागर,आ. अमल महाडिक यांनी घेतली अमृत पाटील आणि रसिका पाटील यांची भेट.

बालिंगा/मोहन कांबळे:
जिल्हा परिषद शिंगणापूर मतदारसंघातील विद्यमान सदस्य रसिका अमृत पाटील यांच्या आज शिंगणापूर येथील घरामध्ये कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाश आबिटकर तसेच कोल्हापूर दक्षीणचे आमदार अमल महाडिक व कोल्हापूर उत्तर चे आमदार राजेश क्षीरसागर यांनी आज शिंगणापूर येथे रसिका पाटील व अमृत पाटील यांची भेट घेतली.

शिंगणापूर मतदार संघ हा सर्वसाधारण महिला करीता आरक्षीत झाला आहे.तर जिल्हा परिषद अध्यक्षपद हे सर्वसाधारण महिला करीता आरक्षीत आहे,त्या मुळे या भेटीला एक वेगळेच महत्त्व प्राप्त झाले आहे.
जिल्हा परिषद शिंगणापूर मतदार संघात विधान परिषद चे आमदार सतेज पाटील यांचे रसिका पाटील व अमृत पाटील हे कट्टर कार्यकर्ते आहेत ते या मतदारसंघात काँग्रेसचे उमेदवार आहेत परंतु आजच्या तिघांनी बंद दरवाजाच्या आड चर्चा केल्याने या भेटीला एक वेगळेच महत्त्व प्राप्त झाले आहे. त्यामुळे अमर पाटील व रसिका पाटील हे शिंदे शिवसेनेमध्ये प्रवेश करणार की काय अशी शंका उपस्थित केली जात आहे जर तसे झाले तर सतेज पाटील यांना हा मोठा धक्का आहे. रसिका पाटील ह्या शिंगणापूर ग्रामपंचायतमध्ये सरपंच आहेत. जर रसिका पाटील यांनी शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला तर करवीरचे आमदार चंद्रदीप नरके यांनाही मोठा झटका बसणार आहे कारण शिंगणापूर जिल्हा परिषद मतदार संघात त्यांचे कट्टर समर्थक राजु दिवसे यांच्या पत्नी सौ प्रियांका दिवसे या ईच्छुक असुन त्यांनी मतदार संघात गाठी भेटींचा घेऊन संपर्क साधत आहेत तर त्याच्याही उमेदवारीस अडथळा निर्माण होऊ शकतो पर्यायाने आमदार चंद्रदीप नरके ईथे बॅकफूटवर जावु शकतात .
या संदर्भात अमृत पाटील यांचेशी दुरध्वनीवर संपर्क साधुन या बाबतीत खातरजमा केली असता ते म्हणाले की आपण सतेज पाटील यांचे एकनिष्ठ व कट्टर समर्थक आहे.असा कोणताही गैरसमज करुन घेवु नका. माझी पत्नी शिंगणापूरची सरपंच असल्याने पालकमंत्री व आमदार गांवामध्ये आल्याने त्यांचे स्वागत करणे ही नैतिक जबाबदारी आहे त्या करीता स्वागत फलकही लावला असल्याचे त्यांनी या वेळी सांगितले.

spot_imgspot_img
RELATED ARTICLES
Today Live News
Most Popular News