नृसिंहवाडी – श्री दत्तात्रेयांची राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पवित्र नृसिंहवाडीत गुरुवार, २७ नोव्हेंबरपासून दत्तजयंती महोत्सवाला मंगल प्रारंभ होत आहे. कृष्णा–पंचगंगा संगम परिसर भक्तिरसात न्हाऊन निघाला असून उत्सवाच्या तयारीला जोर आला आहे. यंदा अनेक धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे भव्य आयोजन करण्यात आले आहे.
यंदाच्या उत्सवाचा मान पुजारी (राजोपाध्ये) कुटुंबाकडे
परंपरेनुसार यंदाच्या महोत्सवाचा मान विनोद पुजारी (राजोपाध्ये) व बंधू यांच्याकडे असून त्यांनी दत्त देवस्थानच्या सहकार्याने सर्व कार्यक्रमांची आखणी केली आहे.
मुख्य जन्मकाळ सोहळा ४ डिसेंबर रोजी सायंकाळी ५ वाजता पार पडणार असून यावेळी ५ ते ६ लाख भाविकांचा महासागर उसळेल, असा अंदाज वर्तविण्यात आला आहे.
नित्यक्रम आणि धार्मिक कार्यक्रम
उत्सवकाळात नेहमीप्रमाणे
-
काकडआरती
-
पंचामृत अभिषेक
-
महापूजा
-
धुपारती
-
पालखी सोहळा
यांसह विविध नित्य धार्मिक उपक्रम पार पडतील.
सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी
दररोज सायंकाळी ५ ते ७ या वेळेत संगीत व सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केले आहेत. यामध्ये शास्त्रीय, भक्तीगीत, भावगीतांची मनमोहक मैफिल होणार आहे.
या वर्षी संगीतसेवा करणारे कलाकार:
-
रुद्रनाथ कुलकर्णी (कोल्हापूर)
-
क्षितिजा सहस्रबुद्धे (मुंबई)
-
स्वरदा खाडिलकर (सांगली)
-
आदिनाथ वैद्य (पुणे)
-
श्रद्धा जोशी (मिरज)



