Friday, January 16, 2026
Google search engine
HomePOLITICALनाशिक सिंहस्थ २०२७ : तपोवनातील वृक्षतोडीवरून राजकीय तापमान वाढले रोहित पवारांनी अजित...

नाशिक सिंहस्थ २०२७ : तपोवनातील वृक्षतोडीवरून राजकीय तापमान वाढले रोहित पवारांनी अजित पवारांचे केले स्वागत; फडणवीसांवर टीकास्त्र

नाशिकमध्ये २०२७ मध्ये होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याची तयारी जोरात सुरू असताना तपोवन परिसरातील ‘साधूग्राम’ प्रकल्पासाठी होणाऱ्या संभाव्य वृक्षतोडीचा मुद्दा चांगलाच पेटला आहे. अभिनेते आणि पर्यावरणप्रेमी सयाजी शिंदे यांनी या वृक्षतोडीला विरोध दर्शवत आवाज उठवल्यानंतर राज्याची राजकीय वर्तुळही तापली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रतिक्रियांनंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी सोशल मीडियावरून पुन्हा सरकारवर निशाणा साधला आहे.


फडणवीसांच्या वक्तव्यावर रोहित पवारांचा ठाक

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी “काही लोक राजकीय कारणांसाठी अचानक पर्यावरणवादी बनले आहेत,” असे म्हणत विरोधकांवर टीका केली होती. त्यांच्या या वक्तव्यावर रोहित पवार यांनी जोरदार प्रतिक्रिया दिली.

रोहित पवार म्हणाले,
“लोकं राजकीय कारणासाठी पर्यावरणवादी झाल्याचं विधान हे समस्त पर्यावरणवादी कार्यकर्त्यांचा अवमान करणारे आहे. एकीकडे ठेकेदारांचं बिऱ्हाड जगवण्यासाठी हजारो झाडांवर कुऱ्हाड चालवायची आणि विरोध करणाऱ्यांची खिल्ली उडवायची, हे सरकारला शोभत नाही.”

रोहित पवारांचे हे विधान सध्या सोशल मीडियावर चर्चेत आले आहे.


अजित पवारांच्या भूमिकेचं रोहित पवारांकडून स्वागत

तपोवनातील वृक्षतोडीबाबत समोपचाराने मार्ग काढण्याची आणि पर्यावरणाचा समतोल राखण्याची भूमिका अजित पवारांनी घेतली. या भूमिकेचे रोहित पवारांनी कौतुक केले.

ते म्हणाले,
“राजकीय पर्यावरणाचा विचार न करता अजितदादांनी घेतलेली भूमिका स्वागतार्ह आहे. त्यांच्या भूमिकेमुळे पर्यावरणवादी कार्यकर्त्यांना नक्कीच बळ मिळेल.”


अजित पवारांची भूमिका नेमकी काय?

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी तपोवनातील वृक्षतोडीवर बोलताना म्हटले—
“समोपचाराने तोडगा काढला पाहिजे. सयाजी शिंदे यांनी घेतलेली भूमिका पर्यावरणहिताची आहे. विकासाबरोबर पर्यावरणाचा समतोल राखणं काळाची गरज आहे. पर्यावरण वाचलं तरच पुढची पिढी सुरक्षित राहील.”


फडणवीसांचे मत : “कुंभमेळ्यात अडथळे येऊ देणार नाही”

मुख्यमंत्री फडणवीस यांनी कुंभमेळा तयारीशी संबंधित निर्णय पर्यावरणपूरक असतील, असा विश्वास व्यक्त केला.

ते म्हणाले,
“कुंभमेळा हा निसर्गाशी साधर्म्य साधणाऱ्या आपल्या संस्कृतीचे प्रतीक आहे. पर्यावरणाचा ऱ्हास होणार नाही असा मार्ग आम्ही काढू. पण कोणाला वाटत असेल की कुंभमेळ्यात अडथळे निर्माण करावेत, तर असे अडथळे आम्ही येऊ देणार नाही.”


spot_imgspot_img
RELATED ARTICLES
Today Live News
Most Popular News