Friday, January 16, 2026
Google search engine
Homecrimeकोल्हापूर : मनसे शहराध्यक्ष प्रसाद पाटील अडचणीत; महिला अधिकाऱ्याशी अश्लील वर्तन केल्याचा...

कोल्हापूर : मनसे शहराध्यक्ष प्रसाद पाटील अडचणीत; महिला अधिकाऱ्याशी अश्लील वर्तन केल्याचा गंभीर आरोप

कोल्हापूर : कोल्हापूरच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कोल्हापूर शहराध्यक्ष प्रसाद पाटील यांच्यावर महिला अधिकाऱ्याशी गैरवर्तन, अश्लील बोलणे आणि धमकावण्याचे गंभीर आरोप झाले आहेत. या प्रकरणी पाटील यांच्यासह इतर काही जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

महिला अधिकाऱ्याला कार्यालयात जाऊन धमकी?
मिळालेल्या माहितीनुसार, सार्वजनिक बांधकाम विभागातील एका महिला अधिकाऱ्याच्या कार्यालयात जाऊन पाटील यांनी तिला धमकावलं. शिवाय अश्लील शब्दांत शिवीगाळ करून मारहाणीची धमकी दिल्याचं तक्रारीत नमूद करण्यात आलं आहे. त्यामुळे प्रशासनात आणि राजकीय वर्तुळातही या घटनेमुळे संताप व्यक्त होत आहे.

आरटीआयमधून माहिती मागितल्याचा वाद?
प्रसाद पाटील यांनी माहिती अधिकार अधिनियमाअंतर्गत काही माहिती मागवली होती. नियमांनुसार माहिती देण्यासाठी ३० दिवसांचा कालावधी असतो. तरीही, पाटील यांनी संबंधित महिला अधिकाऱ्याकडून ताबडतोब माहिती देण्याची मागणी करत एकेरी भाषा वापरल्याचा आरोप आहे.

तसेच, फोनवर बोलताना त्या महिलेचा उल्लेख अश्लील शब्द ‘छमीया’ असा केल्याचं तक्रारीत नमूद करण्यात आलं आहे.

अजून काही जणांवरही गुन्हा दाखल
प्रसाद पाटील यांच्यासह अभिजीत पाटील आणि इतर दोन ते तीन जणांवरही संबंधित अधिकाऱ्याच्या धमकी, छळ व गैरवर्तनासंबंधी गुन्हा दाखल केला आहे.

राजकीय वर्तुळात खळबळ
मनसेसारख्या पक्षातील वरिष्ठ पदावर असलेल्या नेत्याने सरकारी कार्यालयात जाऊन महिला अधिकाऱ्याचा विनयभंग व धमकावल्याच्या आरोपानंतर जिल्ह्यातील राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. या प्रकरणाची चौकशी सुरू असून पुढील तपास पोलिसांकडून करण्यात येणार आहे.

spot_imgspot_img
RELATED ARTICLES
Today Live News
Most Popular News