प्रयाग चिखली (शहाजी पाटील) :
दत्त जयंती निमित्त करवीर तालुक्यातील श्रीक्षेत्र प्रयाग (चिखली) येथील दत्त मंदिरामध्ये दत्तजन्म काळ उत्सव उत्साहात संपन्न झाला. जयंतीनिमित्त दत्तदर्शन, स्नानपर्व आणि विविध धार्मिक अध्यात्मिक कार्यक्रमासाठी परिसरातील हजारो भाविकांनी क्षेत्र प्रयाग येथे दिवसभर गर्दी केली होती. दरम्यान सोनतळी येथील दत्त मंदिरामध्ये सायंकाळं सहा वाजता जन्म काळ कार्यक्रम झाला
कुंभी कासारी भोगावती तुळशी सरस्वती या पंचगंगेच्या मूळ संगमावर असलेल्या श्री क्षेत्र प्रयाग येथील दत्त मंदिरामध्ये दत्त जयंती निमित्त गेले काही दिवस गुरुचरित्र वाचन दत्तात्रेय नवरात्र असे कार्यक्रम चालू आहेत आज दत्त जयंतीचा मुख्य दिवस होता सालाबाद प्रमाणे पहाटे काकड आरती तर दुपारी जन्म काळ उत्सव संपन्न झाला दुपारी बारा वाजता मंदिरातील दत्तमूर्ती ला पंचगंगा संगम स्नान घालण्यात आले त्यानंतर पालखी काढण्यात आली भजन मृदंगाच्या गजरात पालखी प्रदक्षिणा झाली यावेळी मंदिरामध्ये महाआरती होऊन महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. दिवसभरात मंदिरामध्ये झालेल्या विविध धार्मिक अध्यात्मिक कार्यक्रमाचा हजारो भाविकांनी लाभ घेतला मंदिरातील सर्व पूजा विधी येथील पुजारी समाधान गिरी गोसावी यांनी पाहिले.
दरम्यान सोनतळी येथील दत्त मंदिराचे मठाधिपती मनोहर घाडगे यांच्या मार्गदर्शनानुसार आज सहा वाजता जन्म काळ उत्सव पार पडला आठवडाभर विविध धार्मिक अध्यात्मिक कार्यक्रम पार पडले.