Friday, January 16, 2026
Google search engine
Homecrimeछत्तीसगडमध्ये मोठी कामगिरी : कुख्यात नक्षलवादी ठार, सुरक्षा दलांची यशस्वी कारवाई

छत्तीसगडमध्ये मोठी कामगिरी : कुख्यात नक्षलवादी ठार, सुरक्षा दलांची यशस्वी कारवाई

छत्तीसगडच्या नक्षलग्रस्त भागात सुरक्षा दलांना मोठं यश मिळालं आहे. झालेल्या चकमकीत पीएलजीए (पीपल्स लिबरेशन गुरिल्ला आर्मी) च्या कंपनी क्रमांक 2 चा कुख्यात नक्षल कमांडर मोडियम वेल्ला ठार करण्यात सुरक्षा दलांना यश मिळालं. घटनास्थळावरून मोठ्या प्रमाणात शस्त्रास्त्रांचा साठा जप्त करण्यात आला आहे.

शस्त्रांचा मोठा साठा जप्त
चकमकीनंतर परिसराची झाडाझडती घेताना जवानांना एक लाईट मशीन गन, एक एसएलआर रायफल, एक इन्सास रायफल, एक 303 रायफल तसेच इतर शस्त्रं आणि मोठ्या प्रमाणात दारूगोळा मिळून आला. जप्त करण्यात आलेल्या या शस्त्रांवरून नक्षलवादी मोठ्या प्रमाणावर हिंसक कारवाया करण्याच्या तयारीत असल्याचा अंदाज वर्तवला जात आहे.

वेल्लाचा रक्तरंजित इतिहास
पोलीस महानिरीक्षक सुंदरराज पी यांनी दिलेल्या माहितीनुसार, ठार झालेला वेल्ला अनेक मोठ्या हल्ल्यांचा मास्टरमाइंड होता.

  • 2020, मिनपा (सुकमा) : या प्राणांतिक हल्ल्यात 17 सुरक्षा जवानांना वीरमरण आलं होतं.

  • 2021, टेकलगुडेम (विजापूर) : या हल्ल्यात 22 जवान शहीद झाले होते.
    दोन्ही हल्ल्यांमध्ये वेल्लाचा थेट सहभाग होता, अशी माहिती तपासात स्पष्ट झाली आहे.

मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया
घटनेवर प्रतिक्रिया देताना छत्तीसगडचे मुख्यमंत्री विष्णुदेव साई यांनी सुरक्षा दलांचे मनोबल वाढवले.
त्यांनी म्हटलं :
“आमचे जवान नक्षलवाद्यांशी ताकदीनं लढत आहेत. ऑपरेशनमध्ये हुतात्मा झालेल्या तीन डीआरजी जवानांना आम्ही श्रद्धांजली वाहतो. आमच्या सैनिकांचं बलिदान व्यर्थ जाणार नाही.”

सध्या संपूर्ण परिसरात सुरक्षा दलांची सर्च ऑपरेशन मोहीम अधिक तीव्र करण्यात आली असून, नक्षल चळवळीच्या मुळावर घाव घालण्यासाठी ही कारवाई महत्त्वपूर्ण मानली जात आहे.

spot_imgspot_img
RELATED ARTICLES
Today Live News
Most Popular News