Friday, January 16, 2026
Google search engine
HomePOLITICALसंसदेच्या हिवाळी अधिवेशनाचा चौथा दिवस गाजला; आरोग्य–राष्ट्रीय सुरक्षा उपकर विधेयक, प्रदूषणावर विरोधकांचा...

संसदेच्या हिवाळी अधिवेशनाचा चौथा दिवस गाजला; आरोग्य–राष्ट्रीय सुरक्षा उपकर विधेयक, प्रदूषणावर विरोधकांचा मुद्दा,

नवी दिल्ली : संसदेच्या हिवाळी अधिवेशनाचा आज चौथा दिवस कामकाजाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण ठरला. सकाळी ११ वाजता दोन्ही सभागृहांचे कामकाज सुरू झाले. एसआयआरवरील चर्चेला सरकारने सहमती दर्शवल्याने विरोधकांचा आक्रमक सूर काहीसा मवाळ झाला असला तरी, लोकसभेत आरोग्य आणि प्रदूषणाचा मुद्दा प्रमुख ठरला. दरम्यान, एकाचवेळी लोकसभा व विधानसभा निवडणूक या विषयावर कायदा आयोगाने संसदीय समितीसमोर आपले मत मांडण्याची तयारी केली आहे.


आरोग्य सुरक्षा आणि राष्ट्रीय सुरक्षा उपकर विधेयक लोकसभेत सादर

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी आज लोकसभेत आरोग्य सुरक्षा आणि राष्ट्रीय सुरक्षा उपकर विधेयक, २०२५ सादर केले.
या विधेयकाचा उद्देश —

  • राष्ट्रीय सुरक्षा,

  • सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेसाठी निधी उपलब्ध करणे,

  • विशिष्ट वस्तूंच्या निर्मिती/उत्पादनात वापरल्या जाणाऱ्या यंत्रसामग्रीवर उपकर लादणे

सरकारच्या महसूल वृद्धीसाठी हे विधेयक महत्त्वाचे ठरणार असल्याचे संकेत आहेत.


दिल्लीसह उत्तर भारतातील प्रदूषणावर काँग्रेसची तातडीच्या चर्चेची मागणी

दिल्लीसह उत्तर भारतात प्रदूषण गंभीर पातळीवर पोहोचल्याने काँग्रेस खासदारांनी लोकसभेत तातडीची चर्चा घेण्याचा आग्रह धरला.

खासदार माणिकम टागोर, मनीष तिवारी, विजय वसंत यांनी स्थगन सूचना दाखल करून म्हटले—

  • विषारी हवेने लाखो नागरिकांचे आरोग्य धोक्यात

  • प्रदूषणामुळे कर्करोग, किडनी आजार, मधुमेहाचा धोका वाढतो

  • सरकार केवळ घोषणा करते, पण ठोस कृती नाही

  • प्रदूषणाला राष्ट्रीय आरोग्य आणीबाणी घोषित करावे

टागोर यांनी टीका केली की, “सरकार उपायाऐवजी सल्लागार, रणनीतीऐवजी समित्या बनवत आहे.”


‘एकाचवेळी निवडणुका’ : कायदा आयोगाची संसदीय समितीला माहिती

देशभरात एकाचवेळी लोकसभा व विधानसभा निवडणुका घेण्याच्या कायदेशीर प्रक्रियेवर आज कायदा आयोग संसद समितीसमोर सादरकरण करणार आहे.

spot_imgspot_img
RELATED ARTICLES
Today Live News
Most Popular News