नवी दिल्ली : रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) देशातील सर्व कर्जदारांना दिलासा देणारा मोठा निर्णय घेतला आहे. तीन दिवस चाललेल्या पतधोरण समितीच्या (MPC) बैठकीनंतर शुक्रवारी जाहीर करण्यात आलेल्या धोरणात रेपो दरात २५ बेसिस पॉइंट्सची कपात करण्यात आली आहे. त्यामुळे रेपो दर ५.५% वरून ५.२५% इतका कमी झाला आहे. या निर्णयाचा थेट परिणाम गृहकर्ज, वाहन कर्ज, शिक्षण कर्ज आणि वैयक्तिक कर्जांच्या EMI वर होणार असून, येत्या काही दिवसांत ईएमआय कमी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
कर्जदारांसाठी मोठा श्वास
रेपो दरात झालेल्या कपातीमुळे बँकांचा कर्जावरील व्याजदर कमी होऊ शकतो. यामुळे नवीन कर्ज घेणाऱ्यांना आकर्षक दरांची संधी मिळेल, तर विद्यमान कर्जदारांच्या EMI मध्येही घट होण्याचा फायदा दिसून येईल.
बैठक पूर्ण झाल्यानंतर रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी पत्रकार परिषदेत नवीन व्याजदर आणि आर्थिक अंदाज जाहीर केले.
RBI चे इतर प्रमुख दर — काय बदलले, काय कायम?
-
CRR: ३% (कायम)
-
SDF: ५.२५% (कायम)
-
MSF: ५.७५% (कायम)
-
Bank Rate: ५.७५% (कायम)
रेपो दराव्यतिरिक्त इतर सर्व प्रमुख दर पूर्ववत ठेवण्यात आले आहेत.
महागाईवर नियंत्रण — आशादायी संकेत
रिझर्व्ह बँकेने महागाईबाबत दिलासा देणारे अंदाज व्यक्त केले आहेत.
-
किरकोळ महागाई (CPI) : २०२५–२६ साठी थेट २% वर येण्याचा अंदाज
-
२०२६–२७ च्या पहिल्या तिमाहीत: ३.९% (मागील अंदाज ४.५% पेक्षा कमी)
आरबीआयने महागाईच्या एकूण जोखमी ‘संतुलित’ असल्याचे स्पष्ट केले असून पुढील काही महिन्यांत किंमतीवरील दबाव आणखी कमी होऊ शकतो, असे संकेत दिले.
वाढीचे अंदाज सुधारले — अर्थव्यवस्थेत वेग
वाढीच्या दृष्टीने आरबीआयने लक्षणीय सुधारणा केली आहे.
-
वार्षिक GDP प्रोजेक्शन: ६.८% वरून ७.३%
-
चालू तिमाही Q3: ६.४% वरून ६.७%



