क्रीडा आणि मनोरंजन विश्वातील चर्चेत असलेले क्रिकेटपटू स्मृती मानधना आणि संगीतकार पलाश मुच्छल यांचे लग्न अखेर अधिकृतपणे रद्द झाले आहे. दोघांनीही शनिवारी (दि. ७ डिसेंबर) सोशल मीडियावर पोस्ट शेअर करून याबाबतची माहिती दिली. गेल्या काही आठवड्यांपासून दोघेही सोशल मीडियापासून दूर होते, तर लग्न स्थगित झाल्यापासून त्यांच्या नात्याबद्दल विविध अफवा पसरत होत्या. आता दोघांच्या निवेदनांनंतर सर्व चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे.
“लग्न रद्द करण्यात आले आहे” — स्मृती मानधनाची स्पष्ट कबुली
स्मृती मानधनाने इन्स्टाग्रामवर लिहिले :
“गेल्या काही आठवड्यांपासून माझ्या आयुष्याबद्दल अनेक चर्चा सुरू आहेत. मी खूप खाजगी व्यक्ती आहे, परंतु स्पष्ट करणे गरजेचे आहे की लग्न रद्द करण्यात आले आहे.”
तिने सर्वांना दोन्ही कुटुंबांच्या गोपनीयतेचा आदर करण्याची विनंती केली.
“कृपया आम्हाला वेळ द्या, जेणेकरून आम्ही या परिस्थितीतून सावरू शकू.”
पुढे ती म्हणाली की तिच्या आयुष्यातील सर्वात मोठा उद्देश भारतीय टीमसाठी खेळणेच राहील.
पलाश मुच्छलचीही प्रतिक्रिया; अफवांवर नाराजी
स्मृतीच्या पोस्टनंतर पलाश मुच्छलनेही इन्स्टाग्राम स्टोरी पोस्ट करत नातं संपल्याची कबुली दिली आणि अफवांवर नाराजी व्यक्त केली.
त्याने लिहिले :
“मी माझ्या आयुष्यात पुढे जाण्याचा निर्णय घेतला आहे. माझ्या वैयक्तिक आयुष्याबद्दल निराधार अफवा पाहणे कठीण आहे.”
पलाशने समाजाला संदेश देत म्हटले की :
“गॉसिपवर आधारित मत बनवण्यापूर्वी आपण थांबायला शिकलं पाहिजे. शब्द लोकांना दुखावू शकतात.”
तसेच त्याने बदनामी करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्याचा इशाराही दिला.
फोटोज डिलीट, व्हायरल चॅट आणि वाढलेली चर्चा
२३ नोव्हेंबरला दोघांचे लग्न ठरले होते. पण लग्नाच्या दिवशी स्मृतीच्या वडिलांची प्रकृती बिघडल्याने समारंभ स्थगित करण्यात आला.
यानंतर :
-
स्मृतीने लग्नसोहळ्याचे सर्व फोटो इन्स्टाग्रामवरून डिलीट केले
-
पलाशचे एका मुलीसोबतचे चॅट व्हायरल झाले
-
सोशल मीडियावर पलाशने धोका दिला असल्याची चर्चा पसरली



