Friday, April 3, 2026
HomeUncategorizedभीमा कृषी प्रदर्शनामध्ये फुले विभागामध्ये विनायक कांबळे यांचे जरबेरा फुलांनी मिळविला प्रथम...

भीमा कृषी प्रदर्शनामध्ये फुले विभागामध्ये विनायक कांबळे यांचे जरबेरा फुलांनी मिळविला प्रथम क्रमांक.

बालिंगा (मोहन कांबळे):  नुकतेच मेरी वेदर ग्राउंड वरती भीमा कृषी प्रदर्शन मोठ्या उत्साहात पार पडले.
या प्रदर्शनातील फुले विभागामध्ये बालिंगा येथील प्रगतशील शेतकरी विनायक आनंदराव कांबळे यांचे जरबेरा फुलांना या प्रदर्शनामध्ये कृषी विभाग महाराष्ट्र शासन व भीमा कृषी उद्योग यांच्याकडून प्रथम क्रमांक जाहीर केला. याचे पारितोषिक पालकमंत्री प्रकाश आबीटकर , कॅबिनेट मंत्री चंद्रकांत दादा पाटील, खासदार धनंजय महाडिक तसेच समरजित घाटगे यांच्या उपस्थितीमध्ये पुरस्कार देऊन विनायक आनंदराव कांबळे व सौ. गोकर्णा विनायक कांबळे या गौरव करून प्रथम पारितोषिक देवुन उभयंतांचा सत्कार करण्यात आला.
बालिंगा येथील विनायक कांबळे या तरुण उद्योगपती शेतकऱ्याने स्वतःच्या शेतामध्ये जरबऱ्यांच्या फुलांची बाग फुलवली आहे . मोठ्या कष्टाने व उमेदीने पॉली हाऊस मध्ये रोपांना वाढवून जरबेरा फुलांची विक्री करत आहेत.
बालिंगा
पंचक्रोषी मध्ये या मुळे त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_imgspot_img

Most Popular