Thursday, April 16, 2026
HomeSocialखुपिरे येथील तरुण बेपत्ता

खुपिरे येथील तरुण बेपत्ता

कोल्हापूर (प्रतिनिधी) – करवीर तालुक्यातील खुपीरे गावातील एक तरुण गेल्या काही दिवसांपासून बेपत्ता झाल्याची घटना समोर आली असून परिसरात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

स्वप्निल हिंदुराव पाटील (सातवेकर), रा. खुपीरे, ता. करवीर, जि. कोल्हापूर हा तरुण दि. 21 मार्च 2026 रोजी आपल्या घरातून बाहेर पडला होता. मात्र त्यानंतर तो परत न आल्याने कुटुंबीयांनी शोधाशोध सुरू केली. नातेवाईक, मित्रपरिवार तसेच आसपासच्या परिसरात शोध घेऊनही त्याचा काहीही मागमूस लागलेला नाही.

स्वप्निलच्या बेपत्ता होण्यामुळे कुटुंबीय अत्यंत चिंतेत असून त्यांनी नागरिकांना मदतीचे आवाहन केले आहे. या प्रकरणाची माहिती स्थानिक पोलिसांनाही देण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.

दरम्यान, संबंधित तरुण कुणाला कुठे दिसून आल्यास किंवा त्याच्याबाबत कोणतीही माहिती मिळाल्यास खालील क्रमांकावर तात्काळ संपर्क साधावा, असे आवाहन कुटुंबीयांनी केले आहे:
📞 8605175050
📞 9637686489
📞 8975731015

या घटनेमुळे खुपीरे व परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून नागरिकांनी सतर्क राहून सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_imgspot_img

Most Popular