Friday, April 3, 2026
HomeAdministrationसर्वोत्तम विभाग म्हणून बाष्पके विभागाचा व संचालक ध.प्र. अंतापूरकर यांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते...

सर्वोत्तम विभाग म्हणून बाष्पके विभागाचा व संचालक ध.प्र. अंतापूरकर यांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सत्कार.

मुंबई (मोहन कांबळे):  राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज सह्याद्री अतिथी गृह मुंबई येथे 150 दिवसाचा ई गव्हर्नर्स सुधारणा व सेवाकर्मी कार्यक्रमांतर्गत बाष्पके विभाग हा सर्वोत्कृष्ट विभाग म्हणून विभागाचे संचालक ध.प्र.अंतापुरकर यांचा प्रशस्तीपत्र देवुन विभागाचा सत्कार करण्यात आला.
ई गव्हर्नर्स हा कार्यक्रम राज्यात जिल्हास्तरावर विभागीय स्तरावर व राज्य स्तरावर विविध शासकीय कार्यालयामध्ये यशस्वीपणे राबवण्यात आला. यामध्ये कार्यालयाचे संकेतस्थळ, आपले सरकार प्रणाली, ई ऑफिस प्रणाली, कार्यालयाचा डॅशबोर्ड, व्हाट्सअप चॅट बॉट, कृत्रिम बुद्धिमत्ता, व ब्लॉक चेनचा वापर आणि भौगोलिक माहिती प्रणाली या घटकावर सहभागी कार्यालयांचे मूल्यमापन करण्यात आले.
या मूल्यमापनामध्ये राज्यस्तरावरील 68 आयुक्तालय व संचालनालयामध्ये बाष्पके संचाललनालयाने उत्कृष्ट कामकाज केल्याने त्यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
माहिती तंत्रज्ञान मंत्री आशिष शेलार,राज्याचे मुख्य सचिव राजेश अग्रवाल, पोलीस महासंचालक सदानंद दाते तसेच राज्यातील कार्यालय प्रमुख उपस्थितीत होते.
यामुळे या विभागाचे संचालक श्री. ध. प्र. अंतापुरकर व त्यांचे सर्व सहकारी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे सर्व स्तरावर अभिनंदन होत आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_imgspot_img

Most Popular