सांगरूळ / वार्ताहर:
सांगरूळ येथे सराफ व्यावसायिक तेजराम पिराजी माळी (सुंदेशा ) यांना रात्रीच्या अंधाराचा फायदा घेऊन रस्त्यात अडवून मारहाण करून झालेल्या लुटमार प्रकरणात स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने कारवाई करून दोन आरोपींना अटक केली आहे गेल्या २१ मार्च २०२६ रोजी रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास तेजराम माळी आपले सांगरूळ ( ता .करवीर ) येथे असलेले लक्ष्मी ज्वेलर्स दुकान बंद करून मोटरसायकल वरून घरी जात होते . सांगरूळ कुडित्रे फॅक्टरी रस्त्यावर विलास कॉर्नर येथे त्यांची मोटरसायकल आल्यानंतर अज्ञात इसमानी मोटरसायकल थांबून त्यांना मारहाण करून ५१ ग्राम सोन्याचे व ११९ ग्रॅम चांदीचे दागिने व रोख रक्कम जबरदस्तीने लुटली होती . या घटनेत नंतर पोलिसांनी त्वरित तपास सुरू केला होता संपूर्ण तपासनंतर हा गुन्हा प्रवीण माळी व त्याची महिला साथीदार खुशबू राज परमार यांनी ठरवून केला असल्याची पोलिसांना माहिती मिळाली पोलिसांनी २८ मार्च रोजी पतौडी घाट रंकाळा येथे दोघांना ताब्यात घेतले . आरोपीकडून चोरी केलेले ५१ ग्राम सोन्याचे व ११९ ग्रॅम चांदीचे दागिने तसेच गुन्हा करण्यासाठी वापरलेली एक बुलेट मोटरसायकल व एक्टिवा मोपेड जप्त करण्यात आली . एकूण मुद्देमालाची किंमत अंदाजे ११ लाख १८ हजार २५० रुपये आहे अधिक तपास करवीर पोलीस करत आहेत .
.ही कारवाई पोलीस अधीक्षक श्री योगेश कुमार गुप्ता उपविभागीय पोलीस अधिकारी सुजित क्षीरसागर यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अनिव्हेशन शाखेचे पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण पोलीस उपनिरीक्षक जालिंदर जाधव पोलीस अमलदार महेश पाटील हिंदुराव कैसरे संजय कुंभार संतोष बरगे रोहित मर्दाने वैभव पाटील प्रदीप पाटील सागर माने अमित सर्जे अरविंद पाटील संजय पडवळ संजय हुंबे व महिला पोलीस कॉन्स्टेबल प्रज्ञा पाटील यांनी केली