दोनवडे (वार्ताहर) :
अवकाळी पावसामुळे बालिंगे येथील पॉलिहाऊसचे छत उडाले. यामध्ये विनायक कांबळे यांचे सुमारे तीन लाखाचे नुकसान झाले.
पाडळी खुर्द येथे शेतकरी विनायक कांबळे यांचे पॉलिहाऊस आहे त्यामध्ये जरबेरा फुलाची लागण केली होती सुमारे 32 गुंठ्यात त्यांचे ग्रीन हाऊस होते ऐनवेळी आलेल्या अवकाळी पावसामुळे ग्रीन हाऊसचे छतच उडाल्याने त्यांचे मोठे नुकसान झाले आहे. नुकतीच त्यांनी पॉलिहाऊस मध्ये जरबेरा फुलांची शेती केली होती ऐनवेळी आलेल्या अशा अवकाळी पावसाने त्यांचे मोठे नुकसान झाले आहे.