कळे : जनरल प्रॅक्टिशनर्स असोसिएशन, कोल्हापूरच्या अध्यक्षपदी डॉ. शिवराज जितकर यांची बिनविरोध निवड झाली. डॉ. शशिकांत पाटील यांची सचिवपदी तर खजिनदारपदी डॉ. अनिल कवठेकर यांचीही बिनविरोध निवड झाली. असोसिएशनची २०२६-२७ सालाकरिता वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीत पार पडली. या सभेत नवीन कार्यकारिणीची निवड करण्यात आली.
उपाध्यक्षपदी डॉ. गुणाजी नलवडे व डॉ. विनायक शिंदे यांची निवड झाली. तसेच सदस्य म्हणून डॉ. पूजा पाटील, डॉ. वर्षा पाटील, डॉ. किशोर निंबाळकर, डॉ. सचिन आजगेकर, डॉ. दीपक पोवार, डॉ. प्रशांत खुटाळे, डॉ. हरीश नांगरे, डॉ. मानसिंग पाटील, डॉ. सुधाकर ढेकळे, डॉ. महादेव जोगदंडे यांचा समावेश आहे. सल्लागार म्हणून डॉ. सचिन मुतालिक, डॉ. शिरीष पाटील व डॉ. रणजीत सावंत यांची निवड करण्यात आली. प्रॅक्टिशनर्सच्या समस्या सोडवण्यासाठी सातत्याने पाठपुरावा केला जाईल, असेही त्यांनी नमूद केले.
या वेळी डॉ. शिवाजी मगदूम, डॉ. राजेश सोनवणे, डॉ. उद्यम वोरा, डॉ. महाजन, डॉ. रमेश जाधव, डॉ. राजेश कुंभोजकर, डॉ. शुभांगी पार्टे, डॉ. अर्चना पाटील, डॉ. अरुण धुमाळे, डॉ. शीतल पाटील यांच्यासह सभासद उपस्थित होते. सचिव डॉ. शशिकांत पाटील यांनी आभार मानले.
#फोटो ओळ : डॉ. शिवराज जितकर, डॉ. शशिकांत पाटील, डॉ. अनिल कवठेकर