बालिंगा/ वार्ताहर.
समाजाचं काहीतरी आपण देणं लागतो या भावनेने 1980 – 81 सालातील बालिंगा नागदेवाडी शाळेतील मित्रांनी आपला मित्र राजेंद्र बापूसो कोरे यांचा 50 वा. वाढदिवस तब्बल 46 वर्षांनी एकत्र येऊन *उमेद मायेच घर* कोपार्डे ता. करवीर या ठिकाणी गरजू मुलांना सुमारे 25 हजार रुपयांचे शैक्षणिक व दैनंदिन गरजेच्या वस्तू देऊन साजरा करण्यात आला. सर्व मुलांनी आपली मनोगत व्यक्त केलीत. सामाजिक बांधिलकी या नात्याने असा वाढदिवस साजरा करणे काळाची गरज आहे.अशा प्रकारचे वाढदिवस साजरे करावेत अशा प्रकारच्या प्रतिक्रिया सर्वांनी व्यक्त केल्या. उमेद फाउंडेशनचे प्रकाश गाताडे व प्रकाश म्हेत्तर सर यांनी विशेष कौतुक करून सर्वांचे आभार व्यक्त केले.
यावेळी भरत ढेरे, राजेंद्र कोरे, शिवाजी बागडी, शिवाजी वाडकर, मधुकर दिवसे, अविनाश नारकर, नंदकुमार माळी, सज्जन ढेरे,शरद निगडे,विनायक कांबळे,अरुण निगडे,अरविंद दळवी,मनोज आगरवाल, आनंदा जांभळे, सचिन जांभळे, प्रथमेश वाडकर, प्रज्वल ढेरे,संदीप गायकवाड आदी उपस्थित होते.