Wednesday, April 15, 2026
HomeEducationपन्हाळा पंचायत समिती शिक्षण विभागाला दोन ऑफिस तिजोऱ्यांची भेट

पन्हाळा पंचायत समिती शिक्षण विभागाला दोन ऑफिस तिजोऱ्यांची भेट

पन्हाळा प्रतिनिधी :
पन्हाळा तालुका माध्यमिक शाळा R.T.E. व कोल्हापूर जिल्हा मुख्याध्यापक संघाच्या वतीने पन्हाळा पंचायत समितीच्या शिक्षण विभागाला दोन ऑफिस तिजोऱ्या भेट देण्यात आल्या. कार्यालयातील महत्त्वाच्या फाईल्स व कागदपत्रांची सुयोग्य मांडणी व सुरक्षितता सुनिश्चित करण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला.

पंचायत समितीच्या शिक्षण विभागात मोठ्या प्रमाणावर कागदपत्रे व फाईल्स असल्याने त्यांची व्यवस्थित जपणूक करणे आवश्यक होते. यासाठी गटशिक्षणाधिकारी श्री. शिवाजी मानकर यांनी मुख्याध्यापक संघाकडे तिजोऱ्यांची मागणी केली होती. त्यांच्या या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत मुख्याध्यापक संघाने दोन तिजोऱ्या भेट स्वरूपात प्रदान केल्या.

या तिजोऱ्यांच्या चाव्या गटविकास अधिकारी सौ. सोनाली माडकर यांच्या हस्ते गटशिक्षणाधिकारी शिवाजी मानकर यांच्याकडे सुपूर्द करण्यात आल्या. या उपक्रमामुळे कार्यालयीन कामकाजात अधिक शिस्त व सु-सूत्रता येणार असल्याचे सांगण्यात आले.

कार्यक्रमास विस्तार अधिकारी के. एस. पाटील, महाराष्ट्र राज्य शाळा कृती समितीचे कार्याध्यक्ष बाबासाहेब पाटील, कोल्हापूर जिल्हा मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष राहुल पवार, सहसचिव श्रीकांत पाटील, पन्हाळा-गगनबावडा तालुका अध्यक्ष एस. आर. पाटील, सचिव ए. वाय. शिंदे, शिक्षक परिषदेचे जिल्हाध्यक्ष पंडित पवार तसेच अजित रणदिवे, संभाजी जाधव, कवठेकर सर, सौ. पाटील मॅडम, राहुल रेडेकर व कांबळे सर आदी उपस्थित होते.

या उपक्रमाबद्दल शिक्षण विभागाने मुख्याध्यापक संघाचे आभार मानले असून, अशा सहकार्यामुळे शैक्षणिक प्रशासन अधिक सक्षम होण्यास मदत होत असल्याचे मत व्यक्त करण्यात आले.

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_imgspot_img

Most Popular