Wednesday, April 15, 2026
HomeSportपन्हाळ्याच्या ऐतिहासिक भूमीवर फुटबॉलचा थरार; पन्हाळा फुटबॉल क्लबचे यशस्वी आयोजन

पन्हाळ्याच्या ऐतिहासिक भूमीवर फुटबॉलचा थरार; पन्हाळा फुटबॉल क्लबचे यशस्वी आयोजन

पन्हाळा : ऐतिहासिक पन्हाळगडाच्या साक्षीने पन्हाळा फुटबॉल क्लबतर्फे आयोजित भव्य फुटबॉल स्पर्धेचा दुसरा सत्र नुकताच उत्साहात पार पडला. या स्पर्धेत रंगलेल्या चुरशीच्या सामन्यांनी क्रीडाप्रेमींचे भरभरून मनोरंजन केले.

जिल्ह्यातील विविध नामांकित संघांनी स्पर्धेत सहभाग घेतला होता. अंतिम सामन्यात Elight FC आणि शिवप्रेमी FC यांच्यात अत्यंत रोमांचक लढत पाहायला मिळाली. दोन्ही संघांनी उत्कृष्ट कौशल्य, वेग आणि चपळता दाखवत प्रेक्षकांची मने जिंकली.

पन्हाळा फुटबॉल क्लबच्या सुयोग्य नियोजनामुळे स्पर्धा शिस्तबद्ध आणि उत्साही वातावरणात पार पडली. विजेत्या संघांना आकर्षक चषक आणि रोख बक्षिसे देऊन गौरविण्यात आले. या स्पर्धेला स्थानिक नागरिक आणि क्रीडाप्रेमींचा मोठा प्रतिसाद लाभला.

प्रथम क्रमांकाचे बक्षीस पन्हाळ्याचे उपनगराध्यक्ष मा. श्री. सतीश भोसले (भाऊ) आणि सामाजिक कार्यकर्ते अमितदादा पोवार यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. द्वितीय क्रमांकाचे बक्षीस साई सिद्धी कन्स्ट्रक्शनचे मालक सचिन पाटील यांनी दिले, तर तृतीय क्रमांकाचे बक्षीस पन्हाळा नगरपरिषदेचे नूतन नगरसेवक महेश भाडेकर यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले.

स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी भाजप पन्हाळा तालुका अध्यक्ष अमरसिंह भोसले, रवींद्र तोरसे, अमित कुमार दळवी, राजू सोरटे, महेश कुराडे, शितलकुमार गवंडी, संतोष काशीद, प्रदीप गवळी आणि योगेश वराळे यांचेही सहकार्य लाभले.

“युवकांमध्ये खेळाची आवड निर्माण व्हावी आणि स्थानिक खेळाडूंना व्यासपीठ मिळावे, हा या स्पर्धेचा मुख्य उद्देश होता,” असे आयोजकांनी सांगितले.

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_imgspot_img

Most Popular